अरे बापरे गुंतवणूकदारांना ७ लाख कोटींचा फटका सेन्सेक्स (Sensex) तब्बल सुमारे १,१०० अंकांनी घसरून ७२,४०० च्या खाली आला.


लोकसभा निवडणुकीत ढासळत चालली विश्वासहर्ता, जागतिक संकेतांचा अभाव, कच्च्या तेलाच्या दरात वाढ आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीच्या दबावामुळे भारतीय शेअर बाजार गुरुवारी (दि.९) गडगडला…

सलग पाचव्या सत्रात बाजारात घसरण कायम राहिली. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स (Sensex) तब्बल सुमारे १,१०० अंकांनी घसरून ७२,४०० च्या खाली आला. तर निफ्टी ५० (Nifty) निर्देशांक ३५० हून अधिक अंकांनी घसरून २२ हजारांच्या खाली आला. निफ्टी १९ एप्रिलनंतर २२ हजारांच्या खाली येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

बाजारातील आजच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे ७.०१ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. यामुळे ९ मे रोजी बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३९३.६८ लाख कोटींपर्यंत खाली घसरले. ८ मे रोजी बाजार भांडवल ४००.६९ लाख कोटी रुपयांवर होते. याचाच अर्थ बीएसई सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलाचे ७.०१ लाख कोटींचे नुकसान झाले.

Advertisement

सेन्सेक्स आज ७३,४९९ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ७२,४०० च्या खाली आला. एलटी, एशियन पेंट्स, आयटीसी, इंडसइंड बँक, जेएसडब्ल्यू स्टील, एनटीपीसी, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील, पॉवर ग्रिड, एचडीएफसी बँक हे शेअर्स सर्वाधिक घसरले. तर टाटा मोटर्स, एम अँड एम, एसबीआय, एचसीएल टेक, इन्फोसिस या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.
लोकसभा निवडणूक २०२४ च्या मतदानाचे आतापर्यंत तीन टप्पे पार पडले आहेत. एकूण निवडणुकीपूर्वीचा उत्साह कमी झाला आहे. लोकसभा निवडणूक निकालांची तारीख जसजशी जवळ येईल तशी बाजारातील संदिग्धता वाढणार असल्याचे शेअर बाजारातील तज्ज्ञ सांगत आहेत…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!