दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बनावट कपडे विक्री करणाऱ्यावर युनिट 6 गुन्हे शाखा यांची कारवाई…
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
पुणे शहरात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर इंटरनॅशनल ब्रेन्डेड कंपनीचे साहित्य बनावट कपडे, शूज,विक्री मोठया प्रमाणात होत असते त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत असून नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे अशी फसणूक झाल्यास स्थानिक पोलीस स्टेशन तक्रार करावी असे आव्हान ग्राहक हक्क संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर युनिट 6 गुन्हे शाखेने वाघोली परिसरात बनावट इंटरनॅशनल ब्रेन्डेड कंपनीचे गोडाऊन वर कारवाई केल्याने सर्व स्थरातून कौतुक होत आहे.
दिनांक २० /१०/२०२४ रोजी एका कंपनीचे प्राधिकृत अधिकारी यांनी तक्रार दिली की, साई ब्रँड होम, केसनंद फाटा, वाघोली पुणे येथे त्यांच्या कंपनीचे बनावट/कॉपीराईट कपडे विक्री करीत आहेत. अशी माहिती मिळाल्याने मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा पुणे शहर यांच्या आदेशाने सदर ठिकाणी जाऊन कारवाई केली असता *इसम नामे गौरव सत्यवान नरवाडे वय 2७ वर्षे, रा. वाघोली, तालुका शिरूर जिल्हा पुणे* याचे केसनंद फाटा, वाघोली पुणे या कपड्याचे दुकानांमधून व त्याचे गोडाऊन मधून एकूण 4,94,650/- रुपये कि. चा कॉपीराईट केलेला बनावट माल (शर्ट ) जप्त केला आहे. सदर बाबत *लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा र.नंबर 990/2024 कॉपी राईट ॲक्ट 1957 चे कलम 51,63 अन्वये गुन्हा दाखल* करण्यात आला.
*सदरची कामगिरी ही मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे , मा. पो.उप.आयुक्त गुन्हे, श्री.निखील पिंगळे, मा.सहा.पोलीस आयुक्त, श्री राजेन्द्र मुळीक , पोलिस निरीक्षक, युनिट ४श्री .अजय वाघमारे , पोलीस निरीक्षक युनिट ६ श्री . वाहेद पठाण , यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि मदन कांबळे, युनिट ६ पो.उप.नी. दिगंबर चव्हाण युनिट ४ व युनिट ६ व ४ कडील अंमलदार यांच्या पथकाने केलेली आहे*.

