पुणे महानगरपालिकेच्या धनकवडी क्षेत्रीय कार्यालयात अजब कारभार, कायम कामगारांना घरी बसून पगार चालू…


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

पुणे महानगरपालिका अंतर्गत धनकवडी क्षेत्रिय कार्यालयातील आरोग्य विभाग मधे मुकादम, आरोग्य निरीक्षक मुख्य म्हणजे DSI यांनी मिलीभगत करून बरेचसे कामगार घरी बसून पगार घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या बाबत DSI ASI यांना लाखो रुपये ची माया जमा होत आहे. धनकवडी क्षेत्रीय कार्यालयातील कामगारांनीच भांडाफोड केली…

धनकवडी क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असणाऱ्या बायोगॅस कोटी या ठिकाणी अनेक कायम कामगार व ठेकेदार मार्फत कामगार कचरा बिगारी पुरवले जातात.या ठिकाणी तब्ब्ल 40 कामगार आहेत असे असताना या ठिकाणी कायम कामगारांची हजेरी लिहिणे ,कामाचे ठिकाण सांगणे ही कामे मुकादम,व आरोग्य निरीक्षक मार्फत केले जाते.
असे असताना अनेक कायम कामगार आरोग्य निरीक्षक व मुकादम यांना निम्मा पगार (बंद घर ) म्हणून दिला जातो व निम्मा पगार घरी बसून कामगारांना दिला जातो.

Advertisement

बंद घर असलेले कामगार पुढील प्रमाणे…
1) दत्ता पाटोळे
2) प्रकाश वाढधरे
3) साळवे बाई
कात्रज कोटी वरही याच प्रकारे कामगार घरी बसून पगार घेत असल्यामुळे धनकवडी क्षेत्रीय कार्यालय हे भ्रष्टाचाराचा आगार असल्याचे बोललं जाते. या भ्रष्ट कारभारात आरोग्य निरीक्षक DSI विक्रम कथवते साहेब, ASI प्रमोद ढसाळ यांना वरील आरोग्य कोटी वरून 1लाख रुपये बंद घर चे चालू असल्याचे दाबक्य आवाजात चर्चा आहे.

तसेच सयंभु ट्रान्सपोर्ट च्या कचरा गाड्या वर कचरा कलेक्ट करण्यासाठी दर महिना 80 ते 2000 रुपये पर्यंत प्रत्यक घर ते दुकानदार काडून वर कमाई मिळत असल्यामुळे खात्याचे कामगार देण्या ऐवजी आकाश टेकावडे हे स्वतःचे ड्रायवर कडून करून घेतात. त्याचे वेगळे पैसे संबंधीत अधिकारी व मुकादम यांना तब्बल एक लाख पन्नास हजार रुपये देण्यात येतात अशी माहिती संबंधित खात्याच्या व्यक्ती ने नाव न सांगण्याच्या अटी वर दिली. धनकवडी क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभागात कोटयावधी रुपये चा भ्रष्टाचार चालू असून संबंधित विभागाचे उपायुक्त कदम साहेब व पुणे महानगरपालिका चे आयुक्त भोसले साहेब कारवाई करणार का हे पहावे लागेल


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!