निवडणूक आचारसंहितेत सर्व प्रकारची शस्त्रे व हत्यारे यांना जवळ बाळगून फिरणेस मनाई…


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूका घेण्याचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. आचारसंहीता दिनांक १५/१०/२०२४ रोजी पासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अस्तित्वात राहील. सदरच्या निवडणुका ह्या सुरळीतपणे व शांततेत पार पाडण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखणे कामी सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व उपद्रव टाळण्यासाठी सर्व प्रकारची शस्त्रे व हत्यारे यांना जवळ बाळगून फिरणेस मनाई करणे अत्यंत जरूरीचे आहे. (रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर)

नमूद मुदतीत अधिकृत हत्यार परवान्यावरील कोणत्याही प्रकारची हत्यारे घेवून फिरणेस या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे. सदरचा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना (पोलीस दल, संरक्षण दल, तुरुंग विभाग, बँक सुरक्षा विभाग व इतर केंद्रीय तसेच राज्य शासनाचे अधिकारी व कर्मचारी यांना) लागू राहणार नाही. ज्या परवाना धारकास रुढी प्रमाणे बंदुक डिस्प्ले करण्याचा अधिकार आहे त्यांना हा आदेश लागू राहणार नाही.

Advertisement

सदर आदेशाचा उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये शिक्षेस पात्र राहिल.असे आदेश पुणे पोलीस आयुक्त कार्यालयातून देण्यात आले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!