नवरात्र उत्सव व आगामी सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई


पुणे प्रतिनिधी :- गणेश तुम्मा

नवरात्र उत्सव व आगामी सण-उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांनी गंभीर गुन्ह्यांतील आरोपींवर मोठी कारवाई केली आहे. नागरिकांना सण-उत्सव शांततेत व सुरक्षित वातावरणात साजरा करता यावा, यासाठी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या आदेशानुसार पोलिसांनी परिमंडळ-१ अंतर्गत विविध पोलीस ठाण्यांमधील रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली.

खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी, जबरी चोरी, दारूबंदी कायदा उल्लंघन तसेच अंमली पदार्थांची विक्री करणारे व टोळ्यांशी संबंधित आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम १२६, १२८, १२९ व महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ९३ अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडक पोलीस ठाण्यातील ११, समर्थ ८, फरासखाना ३, विश्रामबाग ७, शिवाजीनगर ३ आणि डेक्कन ११ असे एकूण ४३ आरोपींवर कारवाई करून त्यांना येरवडा मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले.

ही कारवाई केल्यामुळे नवरात्र उत्सव, सार्वजनिक मंडळांचे कार्यक्रम, मिरवणुका, जागरण-गोंधळ, गरबा, रावण दहन आदी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१ पुणे शहर श्री. कृषिकेश रावले, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. कृषिकेश रावले, विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-१ केलेली आहे…


2 thoughts on “नवरात्र उत्सव व आगामी सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!