आयुष कोमकर खून प्रकरण : आंदेकर टोळीच्या पोलिसांनी आवळल्या आर्थिक नाड्या…
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
आंदेकर कुटुंब व सदस्य च्या २७ बँक खात्यांवर टाच, तब्बल ५० लाख ६६ हजार १९९ रुपये फ्रीज. या व्यतिरिक्त टोळीच्या सर्व सदस्यांच्या स्थावर व जंगम मालमत्तेची माहिती घेण्याची प्रक्रिया चालू आहे.
आयुष कोमकर खून प्रकरणी तपास अधिकाऱ्यांनी आंदेकर कुटुंबासह त्यांच्याशी संबंधित सदस्यांवर मोठी आर्थिक कारवाई केली आहे. या कारवाईत आतापर्यंत एकूण २७ बँक खाती फ्रीज करण्यात आली असून त्यामधील तब्बल ५० लाख ६६ हजार १९९ रुपयांची रक्कम गोठवण्यात आली आहे.
यापूर्वी घरझडतीदरम्यान पोलिसांनी जप्त केलेल्या रोख रक्कम, दागदागिने व इतर मौल्यवान वस्तूंपेक्षा ही वेगळी कारवाई असल्याचे तपास पथकाने स्पष्ट केले. यामुळे आंदेकर टोळीच्या आर्थिक सामर्थ्यावर पोलिसांनी सरळ आघात केल्याचे मानले जात आहे.
स्थावर-जंगम मालमत्तेची माहिती गोळा करण्यास सुरुवात
बँक खात्यांव्यतिरिक्त आंदेकर टोळीतील सर्व सदस्यांच्या स्थावर (जमीन, फ्लॅट, प्लॉट्स) व जंगम (वाहन, व्यावसायिक साधने) मालमत्तेची चौकशी सुरू आहे. पोलिसांना या सर्व संपत्तीचा तपशील गोळा करून न्यायालयात सादर करण्याचे निर्देश मिळाले आहेत.
तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे
तपास पथकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, “खून प्रकरणातील आरोपींनी गुन्हेगारी मार्गाने कमावलेल्या संपत्तीचा माग काढणे आणि त्यांना कायदेशीर चौकटीत आणणे हा तपासाचा महत्त्वाचा भाग आहे. आतापर्यंत २७ खाती फ्रीज केली असून पुढील काळात आणखी मालमत्ता शोधली जाण्याची शक्यता आहे.”
आर्थिक नाड्या तोडण्याचा प्रयत्न
तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारची कारवाई केल्याने आरोपींना न्यायालयीन प्रक्रियेत खर्च करणे कठीण होते तसेच त्यांचा दबदबा कमी करण्यास मदत मिळते. आंदेकर टोळीचा प्रभाव रोखण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची पायरी ठरत आहे. असे पोलिसांनी स्पष्टीकरण दिले…




https://shorturl.fm/evCyK