खडकवासला धरण प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी माहिती अधिकार कार्यकर्ता किशोर कांबळे यांचे उपोषण सुरू
पुणे प्रतिनिधी :- गणेश तुम्मा
खडकवासला धरणातून २५ जुलै २०२४ रोजी निष्काळजीपणे व अंदाधुंद पद्धतीने पाणी सोडल्यामुळे तिन्ही होतकरू तरुणांचा बळी गेला, तर एकता नगरी, हिंगणे खुर्द, निंबज नगर व सिंहगड रोड परिसरातील नागरिकांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. ही घटना घडल्यानंतर तत्काळ एकता नगरी येथे भेट देऊन पुण्याचे खासदार मा. मुरलीधर मोहोळ यांनी देखील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच ही दुर्घटना घडल्याचे स्पष्ट केले होते.
मात्र सदर घटनेला एक वर्षाहून अधिक काळ उलटून गेला असूनही जबाबदार अधिकाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळेच रिपब्लिकन बहुजन आघाडीचे माहिती अधिकार कार्यकर्ता किशोर मनोहर कांबळे यांनी आक्रमक भूमिका घेत सिंचन भवन, मंगळवार पेठ, पुणे येथे गुरुवार, दि. २३ सप्टेंबर २०२५ पासून अनिश्चितकालीन उपोषणास सुरुवात केली आहे.
आंदोलनाच्या प्रमुख मागण्या :
१) मानवी जीवितहानी :
खडकवासला धरणाचे पाणी निष्काळजीपणे सोडल्यामुळे तीन युवकांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कार्यकारी अभियंता श्रीमती श्वेता योगेंद्र कुऱ्हाडे आणि कार्यकारी संचालक पाटबंधारे विभाग श्री. हनुमंत गुणाले यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
२) आर्थिक नुकसान भरपाई :
एकता नगरी, हिंगणे खुर्द, निंबज नगर तसेच सिंहगड रोड परिसरातील नागरिकांचे झालेले कोट्यवधी रुपयांचे नुकसान जबाबदार अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात यावे.
३) खोट्या तक्रारींविरुद्ध कारवाई :
सदर प्रकरण बाहेर आल्याने कार्यकर्ते किशोर कांबळे यांच्यावर सूडबुद्धीने समर्थ पोलिस ठाण्यात व जिल्हाधिकारी कार्यालयात खोट्या तक्रारी करण्यात आल्या. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध SC/ST Atrocity Act 1989 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा.
४) हडपसर भूखंड घोटाळा :
पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील हडपसर मुठा उजवा कालवा, माईल क्रमांक 15/7, सर्वे नंबर 224 व 226 या भूखंडाच्या खोट्या कागदपत्रांच्या आधारे खाजगी विकसकाला लाभ देण्यात आला. याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.
५) महिला सन्मानाचा प्रश्न :
श्रीमती श्वेता कुऱ्हाडे यांनी कार्यकर्ते व शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध खोट्या विनयभंगाच्या तक्रारी केल्याने समस्त महिलांचा अपमान झाला आहे. या संदर्भात महिला आयोगाने तात्काळ दखल घेऊन कठोर कारवाई करावी.
उपोषणकर्त्यांचा सवाल :
“निष्पाप तरुणांचे प्राण गेले, नागरिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले, तक्रारींचा ढीग असूनही जबाबदार अधिकाऱ्यांना कोण पाठीशी घालत आहे?” असा थेट सवाल उपोषणकर्ते किशोर कांबळे यांनी उपस्थित केला.
—
आंदोलनाला मिळालेला पाठिंबा :
या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अँड. आकाश साबळे, सागर ढावरे, तुषार पायगुडे, संजय साळवी, तानाजी लोहकरे, अमित काळे यांच्यासह अनेक सहकारी उपस्थित होते.
आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे की, मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असून जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होईपर्यंत मागे हटणार नाही. असे आंदोलन करते किशोर कांबळे यांनी सांगितले..




https://shorturl.fm/JIHF6
https://shorturl.fm/isoZB
https://shorturl.fm/bUXBH