मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या वाडिया कॅम्पसमध्ये संयुक्त जयंती निमित्त व्याख्यन संयुक्त जयंती महोत्सव


 

 

 

संयुक्त जयंती निमित्त व्याख्यान व एकपात्री प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी म्हणजे उद्घाटन समारंभ प्रसंगी पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त राजीव नंदकन यांना ‘प्रमुख पाहुणे’ म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या शुभ हस्ते संयुक्त जयंती महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी सर्व महापुरुषांना अनुसरून भाषण देऊन विद्यार्थ्यांना प्रबोधित केले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विजय खरे यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परराष्ट्रीय धोरण” या विषयावर व्याख्यान दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे योगदान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राच्या विकासाच्या जडणघडणीत आर्थिकदृष्ट्या मोठे कार्य केले आहे, असे ते म्हणाले.

Advertisement

कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्राचार्य डॉ. वृषाली रणधीर यांनी “मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय” या विषयावर एकपात्री प्रयोग सादर केला. त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर उभी केली. तसेच संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी पुणे जिल्ह्याचे समाज कल्याण आयुक्त मा. विशाल लोंढे यांना निमंत्रित करण्यात आले होते. विशाल लोंढे हे नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सचे माजी विद्यार्थी असल्याने त्यांनी अगदी मनमोकळेपणाने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. “जर कोणी माझ्यापेक्षा उच्च पदावर जाऊन अर्थात कलेक्टर होऊन मला फाईल मागितली, तर मला खूप आनंद होईल, असे ते म्हणाले.”
या संयुक्त जयंती महोत्सवात निबंध व वक्तृत्व स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये २८९ विद्यार्थी निबंध स्पर्धेमध्ये, १७८ विद्यार्थी व शिक्षक वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. यातील स्पर्धकांसाठी प्रथम क्रमांक ५०००, द्वितीय क्रमांक ३०००, तृतीय क्रमांक २००० असे रोख रक्कमेचे बक्षीस संस्थेचे विश्वस्त प्रा सचिन सानप व डॉ. अशोक चांडक यांच्या वतीने विजेत्यांना महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण आयुक्त श्री. विशाल लोंढे यांच्या शुभहस्ते पारितोषिक देण्यात आली.
संयुक्त जयंती महोत्सवाच्या सर्व संयोजकांच्या वतीने वाडिया कॅम्पसमधील पाच महाविद्यालये एकत्र येऊन सदर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे माननीय विश्वस्त प्रा. सचिन सानप, डॉ अशोक चांडक तसेच नौरोसजी वाडिया कॉलेजचे प्राचार्य डॉ. वसंत चाबुकस्वार, वाडिया कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या डॉ. मनीषा डाले, नेव्हील वाडिया कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटरचे डायरेक्टर डॉ. आनंद दडस, कुसरो वाडिया कॉलेजचे प्राचार्य डॉ. अशोक चांडक आणि नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्राचार्या डॉ. वृषाली रणधीर यांचे प्रोत्साहन उल्लेखनीय ठरले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. मनीषा डाले आणि प्राचार्य डॉ. वसंत बोरकर यांनी महापुरुषांच्या विचारांवर आधारित भाषणे दिली.
संयुक्त जयंती महोत्सवादरम्यान नेस वाडिया महाविद्यालयाच्या ग्रंथालयात १४ तासांचा मॅरेथॉन अभ्यासही आयोजित केला होता. तसेच वाडिया कॅम्पसमध्ये पुण्यातील काही प्रकाशकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यासाठी प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मोलाचा ठरला.
या संयुक्त जयंती महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी समन्वय डॉ. सुभाष अहिरे, डॉ. म्हसदे, डॉ. लक्ष्मण बैसाणे, डॉ. विष्णू कोकाटे, प्रा. प्रमोद शिंदे, डॉ. ज्योती अनिरुद्ध, डॉ. करुणा जुधव, डॉ. वैशाली कांबळे, डॉ. विकास डोळे आणि डॉ. सुहास जाधर. प्रा. सुहास जाधव, प्रा.अक्षय सोनवणे, प्रा. सुहास जाधव, डॉ.समिंदर घोक्षे, डॉ. सचिन कांबळे, प्रा.अजित मुंढे, प्रा. दीपक वायाळ, डॉ. रविंदर मसादे, प्रा. चारुदत्त निमकर, डॉ. आत्माराम आंधळे, डॉ. सचिन गमले, प्रा. सुभाष जाधव, प्रा. तुषार गाडेकर, श्री. प्रकाश कांबळे प्रा. जयंत साळवे, प्रा. सुप्रिया बैसाणे, तसेच निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक डॉ. एस. एस. गाडेकर, डॉ. जयंत अहिवळे, डॉ. मिलिंद नरवडे, प्रा. अर्चना केळकर, प्रा. पंडित, प्रा. माने प्रा. ओम प्रकाश प्रा. सोनाली मधाळे संबंधित संस्थांचे रजिस्ट्रार राजेंद्र तागडे, इंगवले, गाडेकर,
सर्व कॉलेजचे उपप्राचार्य, विविध विभागांचे प्रमुख, सर्व शिक्षक कर्मचारी यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. सरते शेवटी संयुक्त जयंती महोत्सवाच्या समारोप प्रसंगी कार्यक्रमाचे आभार प्रा. प्रमोद शिंदे यांनी मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!