बाप्पांच्या आगमनाची पुणे महानगरपालिकेच्या वतीने जाय्यत तयारी…
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस पुणे महानगरपालिकेच्या वतीने श्री गणेश विसर्जनाकरिता सर्व स्तरांवरुन जय्यत तयारी करण्यात आलेली असून याकरिता मनपाचे विविध विभाग, क्षेत्रिय कार्यालयांनी आपल्या स्तरावरही जय्यत तयारी केलेली आहे.

नदीकिनार परिसरातील विसर्जन घाटांवरील दुरुस्ती, रंगरंगोटी, लोखंडी टाक्या, निर्माल्य कलश, विसर्जन हौद, विसर्जन घाटावरील विद्युत व्यवस्था, कचरा वाहतूक व्यवस्थेचे नियोजन या स्वरुपाच्या कामाबरोबरच सार्वजनिक स्वच्छता, मिरवणूक मार्गावर स्वच्छता व औषधोपचाराची व्यवस्था, ग्रुप स्विपींग, कंटेनर, निर्माल्य कलश, किटकनाशक फवारणी, विसर्जन घाटांवर अग्निशमनदल कर्मचारी व्यवस्थापन, घाटांवर औषध फवारणी, नदी किनारच्या विसर्जन घाटांवर तसेच ज्या भागात नदी, तलाव, विहीरी नाहीत अशा परिसरातून विसर्जन हौद, लोखंडी टाक्यांची सोय करण्यात आलेली आहे. त्याच बरोबर जीवरक्षकांच्या नियुक्त्या, दोन पाळ्यांतून अधिकारी, कर्मचारी यांच्या नियुक्त्या, सुरक्षा यंत्रणा, विद्युत जनित्र, ध्वनिक्षेपक यंत्रणा, जलवाहिनी व मलवाहिन्या यांचे गळती ठिकाणी त्वरीत दुरुस्ती कामे करणेकरिता स्वतंत्र कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करणेत आलेल्या आहेत. ध्वनीक्षेपनाची व प्रकाशाची व्यवस्था करणेत आलेली आहे. सार्वजनिक स्वच्छता गृहे, शौचालयांची स्वच्छता, फिरती शौचालये, सुचना फलक आदी स्तरावरुन तयारी करणेत आलेली आहे.
महापालिकेच्या वतीने सर्व क्षेत्रिय कार्य क्षेत्रात विविध ठिकाणी विसर्जन बांधण्यात आले आहेत

अग्निशमन दलाकडील सर्व अधिकारी व जवानांच्या सर्व प्रकारच्या रजा व आठवडा सुट्या बंद करण्यात येऊन या कालावधीत वरील १८ घाटांवर अग्निशमन दलाकडील अधिकारी स्वत: उपस्थित रहाणार आहेत.
संपूर्ण गणेशोत्सव कालावधीत मुठा नदीकिनारीचे विसर्जन घाट वगळता शहरातील अन्य विसर्जनाच्या ठिकाणी संबंधित क्षेत्रिय कार्यालयांकडून त्यांचे स्तरावर जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
अग्निशमन दल आपल्या सुरक्षेसाठी कटीबध्द असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाच्या दुरध्वनी क्र. १०१ वर संपर्क साधावा.



