पुणे शहरातील गणेश उत्सव निर्विघ्न पार पाडावा म्हणून पोलीस आयुक्तालयामार्फत कठोर उपाय योजना
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
पुणे शहराला गणेश उत्सवाची परंपरा स्वातंत्र्य पूर्व काळा पासून अखंडित पणे चालू आहे. गणेश उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून काही कठोर निर्णय घेण्यात आले आहेत
उत्सवा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडूनये म्हणून उत्सव काळातील बंदोबस्ताची माहिती देण्यासाठी पोलिस आयुक्तालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. भाविकांची सुरक्षा, गर्दीचे नियोजन, वाहतूक कोंडी सोडवण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांचा स्वतंत्र बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गृहरक्षकस्वतंत्र बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गृहरक्षक दलाचे जवान, गुन्हे शाखेची पथके, केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या बंदोबस्तासाठी असणार आहेत. मानाच्या मंडळांसह गर्दीच्या ठिकाणी बाॅम्ब शोधक नाशक पथकाकडून (बीडीडीएस) नियमित तपासणी करण्यात येणार आहे. गर्दी, गैर प्रकारांवर शहरातील वेगवेगळ्या भागात लावलेले १ हजार सीसीटीव्ही कॅमेरे नजर ठेवणार आहेत. मंडळांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
भाविकांसाठी ‘माय सेफ ॲप’…
पुणे शहरात उत्सव काळात रस्त्यावर मोठया प्रमाणत गर्दी होत असल्याने घडामोंडीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी मंडळांची पाहणी केली आहे. भाविकांसाठी माय सेफ ॲप तयार करण्यात आले आहे. उत्सवाची माहिती, वाहने लावण्यासाठी जागा, पोलिस मदत केंद्र, पादचारी मार्ग, बंद रस्त्यांचीपोलिस मदत केंद्र, पादचारी मार्ग, बंद रस्त्यांची माहिती या ॲपद्वारे दिली जाणार आहे. भाविकांसाठी मदत केंद्रे सुरू करण्यात येणार असून, मदत केंद्रांचे काम २४ तास सुरू राहणार आहे.
शहरात पेठ परिसरात दारूची दुकानें,बार उत्सवाच्या कालावधीत मध्यभागातील मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्याची सूचना मंडळाच्यापदाधिकाऱ्यांनी बैठकीत केली होती. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेनंतर फरासखाना, खडक आणि विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मद्य विक्री दुकाने (वाइन शाॅप, परमिट रूम) दहा दिवस बंद ठेवण्यात यावीत, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. उत्सवाच्या काळात जिल्हा प्रशासनाने तीन दिवस मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्याचे (ड्राय डे) आदेश दिले आहेत. प्रतिष्ठापना (७ सप्टेंबर), विसर्जन मिरवणूक (१७ सप्टेंबर) आणि मिरवणूक संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी (१८ सप्टेंबर) मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
पुणे पोलीस आयुक्तालयामार्फत उत्सव काळात बंदोबस्तासाठी लावण्यात येणारे मनुष्यबळ
असा असेल बंदोबस्त…
अपर पोलिस आयुक्त – ४
पोलिस उपायुक्त – १०
सहायक पोलिस आयुक्त – २३
पोलिस निरीक्षक -१२८
सहाय्यक पोलिस निरीक्षक – ५६८
पोलिस कर्मचारी – ४ हजार ६०४
होमगार्ड – ११००
राज्य राखीव पोलिस दल – १ तुकडी
केंद्रीय सुरक्षा दल, शीघ्र कृती दल – १० तुकड्या
पोलिस आयुक्तालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त (प्रशासन) अरविंद चावरिया, प्रवीण पाटील, शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे यांची उपस्थिती होती.



