माजी नगरसेवक वनराज आंदेकर खुन प्रकरणातील एकूण २१ आरोपीविरूध्द दोषारोपपत्र मा. न्यायालयात सादर…


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

नगरसेवक वनराज आंदेकर याचे खुनाचा कट रचुन दि. ०१/०९/२०२४ रोजी रात्री ०९/०० वाजताचे सुमारास फायरिंग व कोयत्याने मारहाण करून खून करण्यात आला
गुन्हयाचे तपासात एकूण २१ आरोपी व ०२ विधी संघर्षित बालक निष्पन्न झाले असुन २१ अटक आरोपीविरूध्द मा. न्यायालयात दिनांक १४/०२/२०२५ रोजी गुन्हयाचे दोषारोप पत्र सादर करण्यात आले आहे. दोषारोपपत्रातील पानांची संख्या १७०० आहे…

समर्थ पोलीस स्टेशन, पुणे गुन्हा रजि. नं. १८८/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ (१), ६१(२),४९,५४,१०९,१११ (१) (i), (२) (३) (४),२३८ सह आर्म अॅक्ट कलम ३ (२५),४ (२५), सह मपोका कायदा कलम ३७ (१) (३)/१३५, सह क्रिमीनल लॉ अमेंडमेंट कलम ७ महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३(१) (i),३ (१) (ii), ३ (२), ३ (४) या गुन्हयाचे केले तपासात गुन्हयातील आरोपी संजिवनी कोमकर यांचे नाना पेठ, पुणे येथील जनरल स्टोअर्सच्या दुकानावर मनपा अतिक्रमण विभागाने कारवाई केली होती. सदरची कारवाई हि वनराज आंदेकर याचे सांगणेवरुन झाली असल्याचा संशय होता तसेच संजिवनी कोमकर, जयंत कोमकर, गणेश कोमकर व प्रकाश कोमकर कुटुंबियाचे वनराज आंदेकर याचे कुटुंबिया बरोबर प्रॉपर्टीवरून वाद चालु होते. त्याचा आरोपी संजिवनी कोमकर, जयंत कोमकर, गणेश कोमकर व प्रकाश कोमकर यांना राग होता. तसेच सन २०२३ मध्ये आदेकर टोळीतील कृष्णा आंदेकर व इतर यांनी गुन्हयातील टोळीप्रमुख आरोपी सोमनाथ सयाजी गायकवाड याचे टोळीतील सदस्य निखिल आखाडे याचा खुन केला होता. वरील दोन्ही कारणावरुन टोळीप्रमुख सोमनाथ सयाजी गायकवाड व संजिवनी कोमकर, जयंत कोमकर, गणेश कोमकर व प्रकाश कोमकर यांनी इतर आरोपीसह माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचे खुनाचा कट रचुन दि. ०१/०९/२०२४ रोजी रात्री ०९/०० वाजताचे सुमारास सोमनाथ सयाजी गायकवाड याचे टोळीतील सदस्य आकाश म्हस्के, विवेक कदम, तुषार कदम व समीर काळे यांनी त्यांचेकडील अवैध पिस्टलमधुन माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचेवर फायरींग करुन इतर ९ आरोपींनी कोयत्याने माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचेवर जिवघेणा हल्ला करुन गंभीर जखमी करुन खुन केला आहे. गुन्हयात आरोपींनी वापरलेले एकूण ८ पिस्टल, १३ जिवंत काडतुस व ०७ कोयते जप्त करण्यात आले आहेत. आरोपीतांनी गुन्हयात वापरलेल्या ७ दुचाकी, ३ चारचाकी वाहने सुध्दा जप्त करण्यात आली आहेत. गुन्हयात एकूण ३९ साक्षीदार तपासले आहेत. दाखल गुन्हयाचे तपासात एकूण २१ आरोपी अटक करण्यात आले असुन दोन विधी संघर्षित बालक ताब्यात घेण्यात आले आहेत. नमुद गुन्हयाचे तपासात एकूण २१ आरोपी व ०२ विधी संघर्षित बालक निष्पन्न झाले असुन २१ अटक आरोपीविरूध्द मा. न्यायालयात दिनांक १४/०२/२०२५ रोजी गुन्हयाचे दोषारोप पत्र सादर करण्यात आले आहे. दोषारोपपत्रातील पानांची संख्या १७०० आहे.

Advertisement

दोषारोपपत्रातील महत्व पूर्ण मुददे-

सीसीटिव्ही फुटेज- तीन ठिकाणचे नानापेठ घटनास्थळावरील, आंबेगाव पठार, दापोली (रत्नागिरी) आरोपीत यांचे आवाजाचे नमुने कार्यवाही
> मकोका कलम १८ चा जबाबदारी
> भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम १८३ प्रमाणे जबाब कार्यवाही
> आरोपीत यांची ओळख परेड कार्यवाही
> आरोपीत यांचे मोबाईलवरुन एकमेकांशी झालेल्या संपर्काबाबत तांत्रिक विश्लेषण कार्यवाही
> आरोपीत यांचे पुर्वीचे गुन्हे रेकॉर्ड संदर्भातील कार्यवाही
> गोपनिय साक्षीदाराकंडे तपास कार्यवाही
> प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे तपास कार्यवाही

आरोपीत यांचे संघटीत गुन्हेगारी टोळीचे स्थावर व जंगम मालमत्तेबाबतची कायदेशीर कार्यवाही, गुन्हयात वापरेलेले अवैध अग्निशस्त्र पुरवठा करणारे परराज्यातील आरोपीबाबत तपास कार्यवाही, आरोपींना गुन्हा करणेकामी मदत करणारे याबाबत तपास कार्यवाही करून पुरवणी दोषारोपपत्र पाठविण्याची तजवीज ठेवली आहे…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!