लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलच्या निकालानंतर भारतीय शेर बाजारात तुफान तेजी …
मुबंई प्रतिनिधी :- लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलच्या निकालानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठ्या वाढीसह व्यवहार सुरू झाले आहेत. सेन्सेक्स, निफ्टी आणि बँक निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर उघडले.
निफ्टी प्रथमच 23,300 च्या वर उघडला आहे. निफ्टी बँकेत सुमारे 1600 अंकांची वाढ झाली असून सेन्सेक्सही पहिल्यांदाच 76,000 च्या पुढे व्यवहार करत आहे. तर निफ्टी 620 अंकांच्या वाढीसह 23151 अंकांच्या पातळीवर उघडला.
एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी बाजार सर्वकालीन उच्चांकावर उघडल्यानंतर भारतीय बाजारातील प्रमुख ट्रेडिंग प्लॅटफॉर्म क्रॅश झाले आहेत. या एक्झिट पोलने भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएसाठी सलग तिसऱ्या टर्मचा अंदाज वर्तवला आहे.
शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी आयटी निर्देशांक, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी निर्देशांकात घसरण दिसून आली, तर निफ्टी बँक, निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी वित्तीय सेवा निर्देशांकात वाढ झाली.
शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात ज्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली त्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये पॉवर ग्रिड, अदानी पोर्ट्स, अदानी एंटरप्रायझेस, श्रीराम फायनान्स, एनटीपीसी, एसबीआय आणि लार्सन या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश होता. तर ज्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली त्या शेअर्समध्ये गॉडफ्रे फिलिप्स, डोम्स इंडस्ट्रीज, ग्लेनमार्क लाईफ, सुवेन फार्मा, सफारी इंडस्ट्रीज आणि सनोफी इंडिया यांचा समावेश होता.
बीएसईचे बाजार भांडवल विक्रमी उच्चांकावर



