“फिर एक बार मोदी सरकार” , एन डी ए ला 352 ते 392 जागा येण्याची शक्यता एक्झिट पोलचा अंदाज…
पुणे प्रतिनिधी :- निवडणुकीच्या 2024 च्या सर्व सात टप्प्यांसाठी मतदान संपल्यानंतर, एक्झिट पोल (Lok Sabha Election Exit Poll 2024) च्या अंदाजावरून दिसून येत आहे की, देशात पुन्हा एकदा मोदी लाट येणार असल्याची शक्यता….
सर्व एक्झिट पोलमध्ये 4 जूननंतर देशात एनडीएचे सरकार स्थापन होणार असल्याचे दिसत आहे. अनेक एक्झिट पोलमध्ये एनडीए 352 पेक्षा जास्त जागा जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
वेगवेगळ्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार काँग्रेस प्रणित इंडिया आघाडी ला 100 ते 140 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे
उल्लेखनीय आहे की, इंडिया टुडे ॲक्सिस माय इंडियानुसार एनडीएला 400 पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. इंडिया डेली लाइव्हच्या एक्झिट पोलनेही एनडीएला 371 ते 400 जागा दिल्या आहेत. तर इंडिया आघाडीला 109 ते 139 जागा मिळण्याची शक्यता आहे.
खरे तर लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने एनडीएला निवडणुकीत 400 हून अधिक जागा मिळतील असा दावा केला होता. इंडिया डेली लाइव्हचा अंदाज बरोबर असेल तर एनडीएने केलेला दावा खरा ठरेल.

