*भीमक्रांती मित्र मंडळ आणि मैत्रेय बुद्ध विहार येथे थायलंड येथून आलेल्या बुद्ध रूपाची स्थापना…
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
बिबवेवाडी परिसरात अप्पर 276 मैत्रेय बुद्ध विहार येथे रविवार दि . 02.06.2024 रोजी क्रांती मित्र मंडळ यांच्या वतीने रेंजहिल्स या संस्थेच्या सहकार्याने थायलंड येथून मिळालेले बुद्ध रूप भन्ते नागघोष यांच्या हस्ते भव्य मिरवणूक संविधान चौक अप्पर ते मैत्रेय बुद्ध विहार अप्पर 276 येथे अतिशय उत्साहात स्थापन करण्यात आली …

भंते नागघोष यांनी परिसरातील मंगलमय वातावरणात बुद्ध मूर्ती प्राणप्रतिष्ठा करून आर्यअष्टांग मार्ग ,पंचशील बुद्ध वंदना घेण्यात आली तसेच बुद्ध मूर्ती चे आवरण काढण्यात आले .भगवान बुद्धांचे मोहक रूप पाहून परिसरातील नागरिक आपोआप नाथमस्तक झाले . या सोहळ्याला 300 ते 400 धम्म उपासक आणि उपसिका उपस्थित होते भन्ते नागघोष यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले तसेच रेंजहिल्स या संस्थेचे पदाधिकारी ओव्हाळ सर यांनी नुसती विहार बांधून चालणार नाही तर या ठिकाणी धम्म चळवळ उभी राहायला हवी ,या ठिकाणी लहान मुलांना बुद्ध वंदना ,पाली भाषेचे वर्ग ,महिलांना उद्योग साठी प्रयेत्न करावे असे सुचवले .
नगरसेवक बाळासाहेब ओसवाल यांनी भीमक्रांती मित्र मंडळ आणि मैत्रेय बुद्ध विहार या कार्यकर्त्याचे कौतुक केले . तसेच वंचित बहुजन आघाडी चे नेते वसंत मोरे यावेळी उपस्तिथ होते. सामाजिक कार्यकर्ते राहुल नागटिळक यांनी सूत्रसंचालन व आभार व्यक्त केले.
भीम क्रांती मित्र मंडळ च्या वतीने आलेल्या नागरिकांना महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते . तसेच परिसरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते नागरिक
कार्यकर्ते, सर्व उपासक, उपासिका तसेच परिसरातील सर्व नागरिक उपस्थित होते. सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती नगरसेवक बाळासाहेब ओसवाल ,नितीन कदम,वसंत मोरे,बाबुराव घाडगे, रवींद्र गायकवाड, सचिन जोगदंड, मिलिंद राजहंस, संजय वाघमारे, राहुल नागटिळक,अमोल परदेशी, सुरेश ओव्हाळ, सिद्धार्थ नागदेवते उपस्थित होते
तसेच भिमक्रांती मित्र मंडळ मैत्रेय बुद्ध विहाराचे अध्यक्ष सोमनाथ दहिभाते,उपाध्यक्ष राजेश वाघमारे ,खजिनदार अमित वाघमारे,सेक्रेटरी सोमनाथ मुळे, सिद्धार्थ डोळस गणेश नागटिळक, सागर सोनवणे,दिलीप गायकवाड संदीप शिंदे,संदीप वाघमारे,ऋषिकेश दहिभाते,लखन वाघमारे,दिनेश यादव रोहित टोणपे,आकाश वाघमारे, आणि सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित



