पुण्याचे खासदार मा. मुरलीधर मोहोळ यांनी सहकार व नागरी उडान मंत्रालयाचा कारभार स्वीकारला…


दिल्ली प्रतिनिधी :- देशामध्ये समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा माध्यम म्हणजे सहकार व नागरी उड्डाण मंत्रालय आणि मग शेवटच्या माणसांचा उद्धार करणं त्याचं जीवन सुखकर करण्यासाठी म्हणून सहकाराचे माध्यम हे खूप मोठे प्रभावी माध्यम आहे. अमितभाई शहा च्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली मी चांगलं काम करीन असं मला विश्वास वाटतो :- मा.मुरलीधर मोहोळ 

पुणे शहराचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी आज सहकार व नागरी उडान मंत्रालयाचा कारभार हाती घेतला मुरलीधर मोहोळ यांनी माननीय अमित शहा यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतल्याचे मोहोळ यांनी सांगितले

Advertisement

दहा वर्षाच्या काळामध्ये खूप चांगलं काम झालं विशेषतः याच्यामध्ये नवी मुंबईमध्ये होणारा विमानतळ पुरंदर मध्ये आंतरराष्ट्रीय होत असलेल्या विमानतळ पुण्याचे विमानतळ निश्चितपणे खूप चांगलं काम मला या निमित्ताने करता येईल

देशातल्या शेतकऱ्यांसाठी देशातल्या सर्वसामान्य माणसासाठी सहकाराच्या माध्यमातून एक समृद्ध जीवन समृद्धीकडे समाज देण्यासाठी खूप काम करण्याची संधी आहे. आज बऱ्यापैकी आपण पाहत असाल जिल्हा बँक असतील सहकारी साखर कारखाने असतील गाव पातळीच्या सोसायटी असते मला असं वाटतं इथपर्यंत सुद्धा आज भारतीय जनता पार्टी खुप चांगल काम केले आहे

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!