आंबेगाव पोलिसांचा धडाका! चितळे बंधु घरफोडीतील आरोपी जेरबंद; १.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त, तीन गुन्हे उघड!


पुणे प्रतिनिधी :- गणेश तुम्मा..

विंडसर काऊंटी सोसायटी, दत्तनगर, नन्हे रोड, आंबेगाव परिसरातील वेद फुड – चितळे बंधु (गाळा क्रमांक १४ व १५) येथे शटर उचकटून चोरी करणाऱ्या आरोपींना आंबेगाव पोलिसांनी जेरबंद केले असून या कारवाईत एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही घटना दि.२५/०१/२०२६ रोजी रात्री २२.१५ ते दि.२६/०१/२०२६ रोजी सकाळी ०७.४५ या कालावधीत घडली. याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ३१/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३०५(अ), ३३१(४), ३३१(३), ३२४(२) प्रमाणे गुन्हा नोंद आहे.

तपास पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे १) ओमकार मारुती देडे (वय २१, व्यवसाय – साफसफाई, रा. गणपती मंदिरासमोर, किरकटवाडी, धायरी, पुणे) आणि २) एक विधिसंघर्षीत बालक अशी आहेत.
पोलिस तपासात सदर आरोपींकडून पुढील एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
१) आंबेगाव पोलीस ठाणे गु. रजि. क्र. ३१/२०२६ (BNS २०२३ – कलम ३०५(अ), ३३१(४), ३३१(३), ३२४(२))
२) आंबेगाव पोलीस स्टेशन गु. रजि. क्र. ३४/२०२६ (BNS ३०२(२))
३) विमानतळ पोलीस स्टेशन गु. रजि. क्र. ३८५/२०२३ (भा.द.वि. कलम ३७९)
या कारवाईत आरोपींकडून एकूण १,२४,६००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये ऑटो रिक्षा, मोटारसायकल आणि रोख रक्कम यांचा समावेश आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास आंबेगाव पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोउनि मोहन कळमकर करीत आहेत.
ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) पुणे श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ पुणे शहर श्री. मिलिंद मोहिते, मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे श्री. राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने यांच्या सूचनेनुसार पार पडली.
या यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर तसेच पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हणमंत मासाळ, निलेश जमदाडे, प्रमोद भोसले, सुभाष मोरे, योगेश जगदाळे, हरिश गायकवाड, राकेश टेकवडे, शिवाजी पोटोळे यांच्या पथकाने सहभाग घेतला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!