अरे बापरे पुणे जिल्ह्यात तब्बल 49 शाळा अनधिकृत …


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

शिक्षण विभागाने पुणे, पिंपरी चिंचवड व जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मिळून ४९ अनधिकृत शाळांची यादीच बुधवारी (ता.१०) जाहीर केली आहे. या यादीच्या माध्यमातून शिक्षण विभागाने पालकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. अशा अनधिकृत शाळांमध्ये पाल्याचा प्रवेश न घेण्याचे आवाहनही शिक्षण विभागाने केले आहे.

शहर व जिल्ह्यातील अनधिकृत शाळांचा शोध घेण्यासाठी पुणे व पिंपरी – चिंचवड महापालिकेचे प्रशासकीय अधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे मोहीम राबविलीहोती. या मोहिमेत अनधिकृत आढळून आलेल्या शाळांची यादी जाहीर करण्यात आली

मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी शहर व जिल्ह्यातील पालक धडपड करत असतात. यातून हे पालक अव्वाच्या सव्वा शुल्क भरून आपल्या मुलांना प्रवेश अशा मोठी मोठी नावे असलेल्या खासगी शाळांमध्ये करत असतात. मात्र अनेकदा या शाळाच अनधिकृत असण्याचा धोका असतो.

शिक्षक विभागाने अनधिकृत शाळा शोध मोहीम ही एप्रिल, मे मधे राबवायला हवी होती तब्ब्ल एक महिन्या नंतर अनधिकृत शाळांची यादी जाहीर करून पालकांचे विदयार्थ्यांचे नुस्कान होत आहे .. अशी यादी शिक्षण विभागाने जाहीर केली त्या शाळेत जर मुलांनी प्रवेश घेतला आहे. तर त्यांच्या पुढील भवितव्यांचा जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्तिथ होत आहे.

पुणे शहर व हवेली अनधिकृत शाळा

Advertisement

पुणे शहर (हवेली तालुक्यासह) : ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल, उंड्री, नारायणा इ टेक्नो स्कूल, वाघोली, दि गोल्डन इरा इंग्लिश मीडियम स्कूल, फ्लोरिंग फ्लोरा इंग्लिश मीडियम स्कूल, मांजरी बुद्रूक, इ. एम. एच. इंग्लिश मीडियम स्कूल, फुरसुंगी, सी. टी. ई. एल. इंग्लिश मीडियम स्कूल, भेकराईनगर, द टायगर इज इंटरनॅशनल स्कूल कदमवाकवस्ती, मेरीगोल्ड इंटरनॅशनल स्कूल, कदमवाकवस्ती, शिव समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल, जांभूळवाडी, दारूल मदिनाह स्कूल, पारघेनगर, कोंढवा खुर्द, टीम्स तकवा इस्लामिक स्कूल ॲँड मक्तब, कोंढवा खुर्द, लेगसी हायस्कूल, अश्रफनगर, कोंढवा बुद्रूक, इमॅन्युअल पब्लिक स्कूल,महंमदवाडी.

 

पिंपरी-चिंचवड

पीपल एज्युकेशन ट्रस्ट, गांधीनगर, पिंपळे निलख, चैतन्य इंग्लिश मीडियम स्कूल, विशालनगर, पिंपळे निलख, आयडियल इंग्लिश स्कूल, जवळकरनगर, पिंपळे गुरव, संपलिंग्स इंग्लिश मीडियम स्कूल, चिंचवडेनगर, मोशी, लिट्ल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल, चिंचवडेनगर, नवजीत विद्यालय लक्ष्मीनगर, वाल्हेकरवाडी, किड्‌सजी स्कूल, पिंपळे सौदागर, एम. एस. स्कूल फॉर किड्स, सांगवी, क्रिस्टल मॉडर्न स्कूल, वडमुखवाडी, चऱ्होली, माऊंट एव्हरेस्ट इंग्लिश स्कूल, कासारवाडी, ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड.

पुणे पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये सरकारची कोणतीही मान्यता किंवा परवानगी न घेता शाळा सुरू असलेल्याचे आढळले शाळा बंद न केल्यास प्रतिदिन दहा हजार रुपये दंड आकारला जाईल तरीही शाळा बंद न केल्यास शाळेची मालमत्तेवर बोजा चढवला जाईल तरीही शाळा बंद न केल्यास  शाळेच्या मालमत्तेवर बोजा चढवला जाईल व व्यवस्थापना विरोधात फौजदारी स्वरूपाच्या गुन्हा दाखल करण्यात येईल असे  शिक्षण अधिकारी संजय नाईक यांनी सांगितले…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!