दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पुणे परिसरात 100 मिटर अंतरात रुग्णांव्यतिरिक्त अन्य व्यक्तीस वावरण्यास बंदी…


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय येथे सौ तनिषा सुशांत भिसे या महिलेस प्रसुतीसाठी रुग्णालयमध्ये उपचाराकरिता आणले असता उपचारामध्ये दिरंगाई झाल्याने सदर महिलेचा दुदैवी मृत्यु झाला आहे. त्या अनुषंगाने दि ०५/०४/२०२५ रोजी पासुन विविध पक्षाचे कार्यकर्ते यांचेकडुन मोर्चे, आंदोलने, निदर्शने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वार व आवारात होत असल्याने रुग्णालय मधील रुग्ण व नातेवाईक यांना खुप त्रास तसेच अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याचप्रमाणे रुग्णांच्या मनामध्ये नाहक भिती उत्पन्न होत असुन आंदोलनामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होवुन रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेला व रुग्णांच्या नातेवाईकांना जाण्यायेण्याकरिता अडचण निर्माण होत आहे. या अनुषंगाने मा पोलीस आयुक्त व रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ प्रमाणे मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये दि. ०९/०४/२०२५ रोजी पासून ते दिनांक १९/०४/२०२५ रोजीपर्यंत अंमलात राहील. सदरच्या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता कलम २२३ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.असा आदेश दिला…

उपचारामध्ये दिरंगाई झाल्याने सदर महिलेचा दुदैवी मृत्यु झाला आहे. त्या अनुषंगाने दि ०५/०४/२०२५ रोजी पासुन
हॉस्पिटल परिसर अतिशय संवेदन शील झाला असल्यामुळे मा पोलीस आयुक्त व रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर,यांनी खालील आदेश दिले
१. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पुणे, हा परिसर व त्याचे सभोवतालच्या १०० मीटर परिसरात रुग्णांच्या नातेवाईकाशिवाय इतर इसमांना एकत्र जमण्यास किंवा रुग्णालयात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.

Advertisement

२. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पुणे, परिसरात दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात येत आहे. सदरचा आदेश संबंधीत रुग्ण, रुग्णवाहिका चालक, रुग्णालयातील कर्मचारी पोलीस अधिकारी व कर्मचारी/सुरक्षा अधिकारी यांना लागु होणार नाहीत.

३. सदर रुग्णालय परिसरात ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास मनाई करण्यात येत आहे.

४. सदर रुग्णालय परिसरात कोणताही आक्षेपार्ह, वाद निर्माण होईल असा मजकूर लिहिण्यास, अगर छापील मजकूर चिकटविण्यास मनाई करण्यात येत आहे….


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!