इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या वर वाळू माफियांचा जीवघेणा हल्ला…


पुणे प्रतिनिधी :- तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर काल सकाळी तहसील कार्यालयाकडे जाताना हल्लेखोरांनी गाडी आडवी घालून चालकाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून लाकडी दांडकी, लोखंडी रोडच्या साह्याने काचा फोडल्या व जीवघेणा हल्ला करून मारण्याचा प्रयत्न केला.

वाळू माफियांकडून झालेल्या हल्ल्यात संपूर्ण इंदापूर तालुक्यात काल खळबळ उडाली. तालुक्याचा प्रमुख च जर सुरक्षित नसेल, तर काय करायचे? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला.

इंदापूरच्या पोलिसांनी अवघ्या काही वेळातच पाच जणांना पकडले. शिवाजी किसन एकाड, पिण्या उर्फ प्रदीप बागल, विकास नवनाथ देवकर, तेजस अनिल वीर व माऊली उर्फ शुभम भोसेकर आशिया पाच आरोपींची नावे आहेत उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांनी संध्याकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली

Advertisement

त्यांनी वाळूमफियांसंदर्भात घेतलेली आक्रमक भूमिका हेच या हल्ल्यामागचे प्रमुख कारण आहे. भरल्या नदीत उडी मारून वाळू माफियांची गठडी वळणारे तहसीलदार म्हणूनही श्रीकांत पाटलांची ओळख तयार झाली आणि तिथूनच त्यांची दहशत निर्माण झाली. पण झालं काय अचानक श्रीकांत पाटलांची बदली झाली, अन् मधल्या काळात एक काळूची मावशी वाळूसाठी एवढी तडफडत होती की, तिच्यामुळे पुन्हा वाळूमाफियांचा हैदोस वाढला. महसूल खात्यात कसा अधिकारी नसावा याचे जागोजागी प्रत्यंतर आले. वाळू माफियांच्या संरक्षणासाठी अगदी पोलीस कोठडीत जाऊन बसण्यापर्यंत एका महिला अधिकाऱ्याची मजल गेली आणि तिथेच इंदापूरच्या या कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले.

श्रीकांत पाटील हे काही इंदापूर तालुक्यात नवीन तहसीलदार नाहीत. यापूर्वी देखील त्यांनी या तालुक्याचा कारभार पाहिलेला आहे. सामान्यांच्या प्रश्नासाठी सामोपचाराने मार्ग काढणारा तहसीलदार आणि चुकीचं कृत्य करणाऱ्यांना वठणीवर
आणणारा तहसीलदार अशी त्यांची तालुक्यात एक प्रतिमा तयार झाली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!