नाशिक शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी धार्मिक व जातीय तेड निर्माण करणाऱ्या घटनेला रोखले वेळीच आरोपीला अटक …
नाशिक प्रतिनिधी :- नासिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी तात्काळ कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याचे आभार मानले जात आहेत.

नासिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी तात्काळ कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याचे आभार मानले जात आहेत. नासिक पंचवटी राजवाडा परिसरात हिंदू युवा वाहिनीच्या नावाच्या लेटरहेडवर अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांविषयी अपेक्षाहार्थ मजकूर छापलेली पत्रके घराबाहेर टाकण्यात आली होती. यानंतर पंचवटी परिसरात शनिवारी दिवसभर तणाव निर्माण झाला होता. अनुषंगाने पंचवटी पोलिसांनी चक्र फिरवत संशयित आरोपी प्रमोद चंद्रकांत सोनवणे यास ताब्यात घेतल
या प्रकरणाची दाखल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. देवेंद्र फडणवीस म्हणाले नासिक पोलिसांनी संपूर्ण प्रकारचा प्रकरणाचा उलघडा केला आहे कारण मंदिराच्या अवतीभवती राहणाऱ्या लोकांना धमकीचे पत्र प्रकाशित करण्यात आले होते. याने प्रकाशित केले त्याला अटक केली आहे. या दुसऱ्या व्यक्तीशी जुनं वैमनस्या असल्या कारणाने गरीब समाजाला धमकी देणारा निळे ,पिवळे झेंडे लावू नका असा मजकूर असलेल्या पत्रक प्रकाशित केले होते . ज्याने हे पत्रक प्रकाशित केला आहे तोही दलित समाजाचा आहे काहीतरी वेगळे हेतूने हे पत्र काढले आहेत पोलीस यामागचे कारण काय आहे हे शोधून काढत आहे याला अटक केली आहे त्याच्याकडून चार मोबाईल आणि दोन लॅपटॉप मिळाले आहेत त्यामुळे अन्य कोणी त्याच्या पाठीशी आहे का दंगल घडवण्यासाठी हे पत्र काढण्यात आले होते का याचा शोध पोलीस घेत आहेत.
नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की आज दिनांक 22/06/ 2024 रोजी पंचवटी पोलीस ठाण्यात ठाणे हद्दीत दोन समाजामध्ये तेड निर्माण होईल या अनुषंगाने छापील पत्रके टाकण्यात आले होते सदर पत्रकारावर एका व्यक्तीचा फोटो व नाव नमूद केले होते परंतु पत्रकार छापण्यात आलेला फोटो मधील व्यक्तीचा काही संबंध नसल्याचे निष्पन्न झाले आहे सदर प्रकारातील मुख्य आरोपी यांनी तयार केलेल्या पत्रकामध्ये दोन समाजामध्ये तेड निर्माण करणे हा मुख्य उद्देश नसून पत्रकार मध्ये नमूद केलेल्या व्यक्ती व मुख्य आरोपी यांच्यामध्ये वैयक्तिक वाद आसून सदर पत्रकावर छापण्यात आलेला फोटो मधील इसमाला त्रास व्हावा या उद्देशाने पत्रक तयार करून टाकण्यात आली होती सदर प्रकरणी पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .



