अनधिकृत फ्लेक्सबाजीवर पुणे महापालिकेचा बडगा! दररोज किमान पाच गुन्हे दाखल करण्याचे आदेश..
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
पुणे शहराचे सौंदर्य आणि शिस्त बिघडवणाऱ्या अनधिकृत फ्लेक्स, बॅनर आणि पोस्टरबाजीविरोधात आता पुणे महानगरपालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. वाढदिवस, स्वागत, राजकीय जाहिराती, सणासुदीच्या शुभेच्छांसाठी शहरभर उभारण्यात येणारे बेकायदेशीर फ्लेक्स हे शहराच्या विद्रुपीकरणाचे मुख्य कारण ठरत असल्याचे लक्षात घेऊन ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना स्पष्ट आदेश दिले आहेत की,
➡️ दररोज किमान पाच अनधिकृत फ्लेक्सविरोधात गुन्हे दाखल करावेत,
➡️ लावण्यात आलेले फ्लेक्स आणि त्यांचे सांगाडे तुकडे करून जप्त करावेत,
➡️ सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर जाहिराती लावणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी.
या आदेशांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक कार्यरत आहे.
शहरातील प्रमुख चौक, सिग्नल, दुभाजक आणि विद्युत खांबांवर मोठ्या प्रमाणावर लावण्यात येणारे हे फ्लेक्स वाहतुकीस अडथळा, अपघाताचा धोका आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान निर्माण करतात. विशेष म्हणजे, राजकीय फ्लेक्सना मिळणारे ‘संरक्षण’ आणि निवडणूकपूर्व काळात वाढलेली जाहिरातबाजी यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे.
महापालिका प्रशासनाने यापुढे कोणालाही अभय न देता ‘फ्लेक्समुक्त पुणे’ अभियान राबविण्याचा संकल्प केला आहे. या निर्णयामुळे शहरातील रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणे पुन्हा एकदा स्वच्छ, नीटनेटकी आणि आकर्षक रूपात दिसावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे….




https://shorturl.fm/Z8waS
https://shorturl.fm/7m8xV
https://shorturl.fm/ckM7d
https://shorturl.fm/UAjxa
https://shorturl.fm/cs9eJ
https://shorturl.fm/77rML