टेम्पो चालकाला मारहाण करून काच फोडणाऱ्या व अरेरावीखोर चालकास हडपसर पोलिसांची अटक


पुणे प्रतिनिधी :- गणेश तुम्मा

पुणे शहर परिसरात हडपसरमध्ये अरेरावीखोर चालकाला पोलिसांची थाटात केली अटक! “कायद्यात राहाल, फायद्यात राहाल” म्हणत आरोपीची गुडघ्यावर बसवून वरात – नागरिकांमध्ये चर्चेचा विषय…

मगरपट्टा ब्रिज परिसरात टेम्पो चालकाला शिवीगाळ व मारहाण करून टेम्पोची समोरील काच फोडणाऱ्या अरेरावीखोर चालकाला हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपीला “कायद्यात राहाल, फायद्यात राहाल” असा इशारा देत गुडघ्यावर बसवून प्रतीकात्मक वरात काढल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Advertisement

या घटनेबाबत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 874/2025 भा.दं.सं. (BNS) कलम 281, 351(2), 352, 324(2), 37(1), 135, 3, 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटना ९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता घडली. स्कूल बस (MH-14 MM 9837) चालकाने टेम्पो (MH-14 KA 0910) चालकाला अडवून शिवीगाळ केली, मारहाण करत लोखंडी टामीने टेम्पोची काच फोडली. या दहशतीनंतर फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी सुरज रमेश पाटील (वय 32, रा. पिंपरी चिंचवड) यास अटक केली आहे.

हडपसर पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.


One thought on “टेम्पो चालकाला मारहाण करून काच फोडणाऱ्या व अरेरावीखोर चालकास हडपसर पोलिसांची अटक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!