कोंढवा परिसरात अवैध बांधकाम करणा-या बांधकाम व्यावसायिकास कोंढवा पोलीस स्टेशनने ठोकल्या बेड्या…
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
पुणे शहर उपनगरात कोंढवा,धनकवडी, कात्रज,वडगाव शेरी, परिसरात मोठया प्रमाणात अवैद्य बांधकामे चालू असून बांधकाम व्यावसायिक अनधिकृत बांधकाम करून नागरिकांची, महानगर पालिकेची फसवणूक करत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम नियमालीचा सर्रास उलंघन करून नफेखोरी करत आहेत. असे असताना कोंढावा परिसरातील पुणे महानगरपालीकेची कोणतीही परवानगी न घेता अवैध बांधकामे करणाऱ्या बांधकाम व्यावसायिक नवनाथ महादेव माने यांचे विरुध्द पुणे मनपा कडुन अनेकवेळा गुन्हे दाखल असुन सुध्दा नवनाथ माने याने परत अशा पध्दतीने अवैध बांधकाम चालु केल्याने कोंढवा पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल करण्यात आला…
कोंढवा पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार
कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मलिकनगर, साईबाबानगर, भाग्योदयनगर, मिठानगर, शिवनेरीनगर, या भागात मोठ्या प्रमाणावर पुणे महानगरपालीकेची कोणतीही परवानगी न घेता अवैध बांधकामे करणान्या बांधकाम व्यावसायिक नवनाथ महादेव माने यांचे विरुध्द पुणे मनपा कडुन अनेकवेळा गुन्हे दाखल असुन सुध्दा नवनाथ माने याने परत अशा पध्दतीने अवैध बांधकाम चालु केल्याने पुणे मनपा कडुन पुणे मनपा अभियंता अमोल पुंडे यांच्या तक्रारीवरून कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं १०७/२५ महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ४३,५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी याने मा. जिल्हा सत्र न्यायालय, पुणे यांच्याकडे दाखल गुन्ह्यात
अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता तो अर्ज न्यायालयाने फेटाळला. सदर गुन्ह्याच्या अधिक तपासामध्ये नवनाथ माने याने साईबाबानगर येथील इमारत पाडताना कोणत्याही प्रकराचे स्थानीक नागरीकांच्या सुरक्षीतेबाबत उपयोजना न केल्याने तसेच कोंढवा भागात एक फ्लॅट अनेक लोकांना विक्री करणे, ठरलेल्या मुदतीत फ्लॅटचा ताबा न देता दमदाटी करणे अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्याने सदर गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२५.३५१,३१८(४) प्रमाणे दाखल गुन्ह्यात कलम वाढ करण्यात आली होती त्या गुन्ह्याच्या अनुषगांने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सदर आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने शोध घेवुन त्याला दि. ०२/०४/२०२५ रोजी खडक पोलीस स्टेशन हद्दीतील सध्या रहात्या घरातुन ताब्यात घेवून त्यास मा. कोर्टासमक्ष हजर केले असता माननीय कोर्टाने नवनाथ माने यास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास मयुर वैरागकर, सहा पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे हे करीत आहेत.



