पुणे शहरात शिवसेनेला पुन्हा एकदा खिंडार,नगरसेवक बाळासाहेब ओसवाल सह चार माजी नगरसेवक भाजपाच्या वाटेवर…


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

शिवसेनेचे 40 आमदार शिंदे गटाशी संलग्न झाले असताना पुणे शहराने उद्दव ठाकरेंना साथ दिली सगळे नगरसेवक उद्दव ठाकरे सोबत राहिले. पुणे शहरात पुन्हा एकदा 5 नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे यांना पुणे शहरातून मोठा धक्का बसणार आहे…

शिवसेनेला विधानसभा निवडणुकीमध्ये अपयश आल्यानंतर आता पुन्हा पुण्यात मोठा धक्का बसणार आहे. पक्षाचे पाच माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर असून, त्यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. येत्या ५ जानेवारी रोजी मुंबईत पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Advertisement

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यातील मतदारांनी भाजप व महायुतीमधील घटकपक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश दिले, तर महाविकास आघाडीतील काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मोठा पराभव केला. या पराभवामुळे पहिल्यांदाच विधानसभेत विरोधी पक्षनेता नाही. यानंतर मागील तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होण्याचे संकेत मिळत आहेत.

या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून भाजप व महायुतीतील इतर पक्षांमध्ये महाविकास आघाडीच्या घटकपक्षांतील नेत्यांचे इनकमिंग होण्याची शक्यता दाट आहे. याची सुरुवात ठाकरे यांच्या शिवसेनेतून होणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!