फरार सराईत गुन्हेगार किरण खवळे अखेर बिबवेवाडी पोलीसांच्या जाळयात…


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

एमपीडीए मधील चार महिन्यापासून फरार बिबवेवाडी पोलीस ठाणे चे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार नामे किरण राजू खवळे रा. गणेशनगर अप्पर बिबवेवाडी पुणे. यास तडिपार करण्यात आलेले असताना सुध्दा त्याचे गुन्हेगारी कृत्य चालू असलेने त्यास मा. पोलीस आयुक्त सोो अमितेश कुमार यांनी चारमहिन्यापुर्वी स्थानबध्द केले होते. स्थानबध्द केलेचे समजताच नमुद आरोपी चार महिन्यापासून फरार होता.

सदर दाखल गुन्हयातील आरोपीचा शोध घेणेबाबत मा. वरिष्ठांनी सुचना दिलेनंतर सदर नमुद आरोर्षीचा तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक श्री अशोक येवले, पोलीस अमंलदार हे मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक गुन्हे मनोजकुमार लोंढे यांचे मार्गदर्शनाखाली व त्यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे दिनांक २०/१०/२०२४ रोजी कोम्बींग ऑपरेशन दरम्यान नमुद आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अमंलदार शिवाजी येवले यांना बातमी मिळाली की, सदरचा आरोपी फुरसुंगी येथे राहत असल्याची खात्रीशीर बातमी मिळालेने मिळालेल्या बातमीवरून बिबवेवाडी पोलीस ठाणे तपासपथकातील अधिकारी व अमंलदार यांनी सापळा रचून स्थानबध्द इसम नामे किरण राजू खवळे रा. गणेशनगर अप्पर बिबवेवाडी पुणे. यास ताब्यात घेण्यात आले असून त्यास स्थानबध्दतेचा आदेश बजावून त्यास नाशिक मध्यवर्ती कारागृह येथे जमा करण्यात आले आहे.

Advertisement

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा, मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त श्री आर राजा, परिमंडळ ५ पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री मनोजकुमार लोंढे, तपासपथकातील अधिकारी पोलीस उप निरीक्षक श्री अशोक येवले, पोलीस हवालदार संजय गायकवाड, प्रशांत धोत्रे, संतोष जाधव, पोलीस अमंलदार ज्योतिष काळे, शिवाजी येवले, आशिष गायकवाड, सुमित ताकपेरे, प्रणय पाटील, प्रणय पाटील, अभिषेक धुमाळ, यांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!