महायुतीच्या घटक पक्षांनी भीतीदायक जाहिराती दाखवल्याने आचारसंहितेचा भंग प्रकरणी निवडणूक आयोगात तक्रार दाखल…
पुणे प्रतिनिधी :- महाराष्ट्रात 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निमीत्ताने आचारसंहिता लागू असून या आचार आचारसंहितेचा भंग (उल्लंघन ) करणाऱ्या जाहिराती BJP – भारतीय जनता पार्टी, महायुती गटा कडून इलेट्रॉनिक मीडियातून प्रसारित करून मतदारांना भीती घालून प्रभावित करणारी जाहिरातीचे प्रसारण करून मतदारांना भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट या महायुती ला भरघोस मताने विजयी करा अशी प्रलोभन दाखगावण्यात येत आहे.
या बाबत ग्राहक हक्क संघर्ष समिती ग्राहक सेवा संस्था चे अध्यक्ष मिलिंद राजहंस यांनी निवडणूक आयोगाला तक्रार दाखल केली आहे…
निवडूक आचारसंहिता लागू असताना मतदारांना प्रलभने दाखवणे,भीती दायक वातावरण निर्माण करणारे जाहीराती दाखवणे, किव्हा भीती दायक दाहक दाखवून आमच्या पक्षाला मतदान करण्यासाठी प्ररुत्त कारणे हा आचारसंहिता चा भंग होतो असे असताना भारतीय जनता पार्टी महायुती चे घटक पक्ष इलेट्रॉनिक मीडियातून आचारसंहितेचा भंग (उल्लंघन ) करणाऱ्या जाहिराती इलेट्रॉनिक मीडियातून प्रसारित करून मतदारांना भीती घालून प्रभावित करीत आहेत. त्या व्हिडीओ जाहिरातीत ते असे दाखवितात की, शासनाने जेष्ठ नागरिकांच्या एस टी प्रवासात दिलेली सूट, लाडकी बहीण योजनेत दिलेले १५००/- रुपये हे सरकार बदलेले तर बंद होतील त्यासाठी ते चालू ठेवण्यासाठी BJP – भारतीय जनता पार्टीलाच मतदान करा अशा आशयाची प्रतीत होणारे स्पष्ट संदेश देणाऱ्या जाहिराती केल्या जात आहेत.
BJP – भारतीय जनता पार्टी कडून सदरचे कृत्ये हे मतदारांना धमकी देऊन घाबरवणे या श्रेणीत येत आहे. यामुळे सदर जाहिरातीच्या इलेट्रॉनिक मीडियातून / सोशल मीडियातून प्रसारणावर त्वरित बंदी घालण्यात यावी व सदर राजकीय पक्षावर आचारसंहितेचा भंग (उल्लंघन ) केल्याप्रकरणी त्वरित कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.असे मिलिंद राजहंस यांनी सांगितले…



