वीरचे पाणी नाझरे धरणात आणणार ः महेश भागवत


सासवड (प्रतिनिधी) बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये अनेक वर्ष तुमच्या विचाराचा खासदार निवडून दिला तरी प्रश्न तसेच राहणार आहेत का? मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या झालेल्या सभेमध्ये आश्वासनांचा पाऊस पडला. मी वीर धरणातून पावसाळ्यामध्ये विसर्ग होणारे पाणी नाझरे धरणामध्ये आणण्याची योजना आखली होती ती योजना जशीच्या तशी अजित पवारांनी सासवड येथील सभेत योजनेला दुजारात येत मांडली व पुरंदरवर बेडगी प्रेमाचा सुचोवात केला असल्याचा घाणाघाती आरोप ओबीसी समाज पक्षाचे इच्छुक उमेदवार महेश भागवत यांनी केला.

सासवड (ता पुरंदर) येथे ओबीसी समाज पक्षाचे इच्छुक उमेदवार महेश भागवत हे पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. ते पुढे म्हणाले, माझ्या संकल्पनेतून वीर धरणातून पावसाळ्यामध्ये विसर्ग होणारे पाणी हे वीर धरणाच्या खालून परिंचे या धरणातून पिलाणवाडी, शिवरी खिंडीमध्ये ओढ्यात सोडले तर ते पाणी कऱ्हा नदीत जाऊन पुढे नझरे धरणापर्यंत पोहोचू शकते
किंवा मांडकीतुन वाल्हे व पुढे नाजरे धरण अशी योजना केली तरी ते पाणी नाझरे धरणात पोहोचेल ही योजना माझ्या परिचय पत्रकामध्ये छापलेली होती. हि योजना आजित पवारांनी सासवड च्या सभेत जशीच्या तशी वाचुन दाखवली मग तुम्ही पुरंदरच्या जनतेने इतक्या वर्षे पाणी दिली नाही. म्हणून निवडून दिलेल्या खासदारांना व सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याची गरज आहे.

Advertisement

माघच्या निवडणुकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती येथील सुपे परिसरात प्रचाराला आले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की या परिसराला दोन वर्षांमध्ये पाणी दिले नाही तर पुन्हा मतदान मागायला येणार नाही असे सांगितले होते.
जिल्ह्यातील ९०% सीएसआर फंड हा बारामतीला नेला असून तेथील विकास केला परंतु तोच सीएसआर फंड इतर तालुक्यांमध्ये वापरला असता तर कॉलेज महाविद्यालय उभी राहिली असती.

पुरंदर तालुका जिरायत असून येथे पाण्याचा दुष्काळ आहे. त्यामुळे या परिसराचा विकास व्हायचा असेल तर पुरंदरचे विमानतळ होणे काळाची गरज आहे. पण यासाठी शासनाने विमानतळ बाधीत शेतकऱ्यांना योग्य परतावा दिला तर शेतकरी आपल्या जमिनी शासनाला देतील. विमानतळात शेतकऱ्यांच्या जमीनी गेल्या तरी त्यांना तेथे मिळणारे विकसीत प्लाँट यामाध्यमातून मोठी व्यवसायिक गणिते मांडता येईल. हे आंतरराष्ट्रीय कार्गो विमानतळ असल्यामुळे शेतीमालाचा उठाव होण्यासाठी ही तालुक्याला मोठी संधी आहे. चाकणने विरोध केला म्हणून विमानतळ पुरंदरला येत आहे. जर पुरंदरला विरोध झाला तर बारामतीला विमानतळाची सर्व तयारी पूर्ण आहे. तेव्हा यांचा तोटा पुरंदरला होणार आहे.
विजय शिवतरेंनी पुरंदरचा तह केला परंतु या तहामध्ये झालेल्या कराराचे वाचन सभेमध्ये झाले नाही. त्यामुळे हा तह नेमका कसा झाला असे देखील भागवत यांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!