पुरंदरचे विमानतळ व गुंजवणी राजकीय आखाड्यात
गुंजवणी विमानतळाचे प्रवर्तक व विरोधक एकाच व्यासपीठावर
सासवड (प्रतिनिधी) अमोल बनकर
पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे अंतरराष्ट्रीय विमानतळ व पुरंदर तालुक्यासाठी जीवनदायी ठरणारी गुंजवणी उपसा सिंचन योजनेचे प्रवर्तक असणारे विजय शिवतारे व विमानतळ संघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता झुरंगे व वाल्हे परिसरात गुंजवणी उपसा सिंचन योजना शेतकऱ्यांनी बंद पाडल्या नंतर येथील राष्ट्रवादीचे प्रमुख नेते प्रा. दिगंबर दुर्गाडे हे आज होत असलेल्या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे या दोन्ही योजना राजकीय आखाड्यातून बाहेर पडतील की राजकीय आखाड्यातच गुंतवून राहतील याकडे मतदारांचे लक्ष आहे.
पुरंदर तालुक्यातील दोन्ही प्रकल्पा मुळे पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राला हे विमानतळ किफायतशीर ठरणार आहे. पुणे जिल्ह्यातील कृषी, व पर्यटन क्षेत्रातील निर्यात मोठ्या प्रमाणावर होणार आहे.
पुरंदर तालुक्यातील पारगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या विमानतळ संघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता झुरंगे हे आता कोणती भूमिका घेणार याकडे परिसरातील बाधित शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर एका बाजूला सरकार विमानतळ करण्याच्या तयारीत असताना झुरंगे कोणती भूमिका बजावणार याकडे देखील शेतकऱ्यांचे लक्ष आहे.
प्रा. दिगंबर दुर्गाडे यांच्या वाल्हे येथील परिसरात गुंजवणी उपसा सिंचन योजनेचे बंद पडलेले काम पुन्हा सुरू होणार का? किंवा त्या शेतकऱ्यांना कोणता न्याय मिळणार किंवा या भागासाठी पुन्हा नवीन सर्वे होणार याकडे देखील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे
विमानतळासाठी शासनाने मात्र जमिनीचा मोबदला अजून तरी जाहीर केलेला नसल्याने शेतकरी अजूनही संभ्रमावस्थेत दिसून येत आहेत. या प्रकल्पाबाबत पुणे जिल्ह्यातील नागरीक शासनाच्या हालचालीवर उत्सुकतेने निरीक्षण करीत आहेत.
कोट……
विमानतळ झाल्यास फूल व फळ उत्पादक उत्पादक शेतकऱ्यांना फायदा
………………………….
पुणे जिल्ह्यातील दौंड, बारामती, इंदापूर, हवेली, चाकण, मुळशी, मावळ, भागातील फूल उत्पादक शेतकऱ्यांना कार्गो हब विमानतळ जवळ असल्याने झेंडू, गुलछडी, शेवंती, अस्टर, जरबेरा, गुलाब, फुल शेतीला तर सिताफळ, अंजीर, डाळिंब फळशेतीला फायदा होईल. तर शेजारील गावातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी स्कोर स्टोरेज गोडाऊन सारखे उद्योग-व्यवसाय सुरू होतील.
…………………………..
या जिल्ह्यातील औद्योगिक व्यवसायाला फायदा होईल
सांगली, सातारा, कोल्हापूर, अमदनगर, शिरवळ, लोणंद, चाकण, बारामती, जेजुरी, औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांना या कार्गो हब विमानतळाचा फायदा होईल व औद्योगिक क्षेत्र वाढेल.
……………
चैकट : पारगाव त्याचबरोबर राजुरी रिसे पीसे या दोन्ही ठिकाणच्या शेतकऱ्यांनी विमानतळासाठी मात्र प्रचंड विरोध दर्शविला आहे मात्र या गावातील बाधीत शेतकरी एकही इंच जागा न देण्यावर ठाम आहेत. विमानतळासाठी जागा न देण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेक वेळा आंदोलने ही होती. यात काही शेतकरी अल्पभूधारक आहेत.
…………………………………… दुष्काळी पुरंदर साठी महत्त्वाचे प्रकल्प
पुरंदरच्या दुष्काळाची ओळख पुसण्यासाठी दुष्काळाची ओळख असणारा पुरंदर तालुक्यात गुंजवणी विमानतळ, लॉजिस्टिक पार्क, रायता प्रकल्प नावळी ऐमआयडिसी पीएमआरडीए हे प्रकल्प मार्गी लागल्यास दुष्काळाची ओळख पुसण्यास मदत होईल
………………………………………
यापूर्वीही घोषणांचा पाऊस
यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री आजित पवार हे पुरंदर मध्ये अनेक वेळा सभांना आल्या नंतर पुरंदरचे सर्व प्रश्न मार्गी लावतो असे सांगितले होते.



