धडाकेबाज कारवाई : औंधमधील स्पा सेंटरवर छापा — १ मुलीची सुटका, महिला मॅनेजर अटकेत


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

दि. २३ एप्रिल २०२६ — पुणे शहर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने औंध परिसरातील एका स्पा सेंटरवर धडक कारवाई करत वेश्याव्यवसायाच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत एका पीडित मुलीची सुटका करण्यात आली असून स्पा सेंटरच्या महिला मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे “पॅली ब्युटी अॅण्ड सलुन स्पा”, फ्लॅट नं. १०, दर्पण अपार्टमेंट, नियोशी पार्क, बँक ऑफ महाराष्ट्र समोर, औंध रोड, पुणे येथे मसाज सेंटरच्या आडून महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बनावट ग्राहकाच्या सहाय्याने माहितीची खातरजमा केली. त्यानंतर अचानक छापा टाकून केंद्रातून एका मुलीची सुटका करण्यात आली.
या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७२/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम १४३, ३(५) तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियम १९५६ अंतर्गत कलम ३, ४, ५ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या कारवाईत स्पा सेंटरची मॅनेजर सूर्यकांताबाई नामदेव वानखेडे (वय ४२, रा. शिवप्रसाद कॉलनी, दगडोबा चौक, चिंचवड, पुणे) हिला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त विवेक मासाळ आणि सहा पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पथकात पोलीस निरीक्षक छगन कापसे तसेच अंमलदार आंधळे, भिवरकर, जाधव, केदार, नदाफ, रसाळ, भुजबळ आणि महिला अंमलदार रेश्मा कंक, वैशाली इंगळे यांचा सहभाग हपोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांवर लगाम घालण्यासाठी पुढील कारवाया सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!