पुणे महानगर पालिकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका…


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

पुणे महापालिका उपायुक्त आणि सहायक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या असून, राज्य शासनाकडून आलेल्या उपायुक्तांकडेही विविध विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, तर काहींना जागेवरच ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांचे खाते बदलण्याची चर्चा रंगली होती. मात्र, त्यांच्याकडे घनकचरा विभाग कायम ठेवण्यात आला असून, अतिक्रमण विभागाची जबाबदारी उपायुक्त माधव जगताप यांच्याकडून काढून सोमनाथ बनकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र पत भोसले यांनी मंगळवारी काढलेल्या ल आदेशानुसार उपायुक्त जयंत भोसेकर नी (मोटार वाहन विभाग, मागासवर्ग हा विभाग, परिमंडल ४), नितीन उदास (समाजकल्याण, समाजविकास, तक्रारनिवारण), अविनाश सकपाळ चे (परिमंडल २), माधव जगताप (करआकारणी व करसंकलन विभाग), विजय लांडगे (स्थानिक संस्था कर,जनगणना विभाग )
संदीप कदम (घनकचरा व्यवस्थापन विभाग),
युनुस पठाण (झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग), किशोरी शिंदे (भांडार व क्रीडा विभाग),
सोमनाथ बनकर (अतिक्रमण व सुरक्षा विभाग),
प्रतिभा पाटील (सामान्य प्रशासन, भूसंपादन व व्यवस्थापनविभाग),
महेश पाटील (दक्षता,मालमत्ता, निवडणूक व आपत्ती व्यवस्थापन विभाग),
राजू नंदकर (उपयुक्त परिमंडल १, प्रशिक्षम प्रबोधिनी, विधानमंडळ कामकाज समन्वयक, मनपा वसाहती व्यवस्थापन),
संजय शिंदे (माहिती तंत्रज्ञान, पर्यावरण, माहिती जनसंपर्कव सोशल मीडिया कक्ष),
चेतना केरुरे (परिमंडल ५),
आशा राऊत (परिमंडल ३, प्राथमिक शिक्षण विभाग, माध्यमिक व तांत्रिक विभाग संनियंत्रण),
प्रशांत ठोंबरे (आकाशचिन्ह व परवाना विभाग, मुद्रणालय), सुनील बल्लाळ (सांस्कृतिक व मंडई विभाग) अशी जबाबदारी देण्यात आली आहे.

Advertisement

तसेच क्षेत्रीय कार्यालयांचे प्रभारी सहायक आयुक्त यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत

चंद्रसेन नागटिळक (येरवडा-कळस धानोरी),
अशोक झुळूक (ढोले पाटील रोड),
संजय पोळ (नगर रोड-वडगाव शेरी),
रवी खंदारे (घोले रस्ता-शिवाजीनगर),
गिरीश दापकेकर (औंध-बाणेर),
शंकर- दुदूसकर (कोथरूड-बावधन),
विजय नायकल (वारजे-कर्वेनगर),
नामदेव भजबळकर (सिंहगड रोड),
सुरेख भणगे (धनकवडी-सहकारनगर),

विजय घुमटकर (वानवडी- रामटेकडी),
वाळासाहेब ढवळे पाटील (हडसपर-मुंढवा),
हेमंत किरुळकर (कोंढवा येवलेवाडी),
किस दगडखेरे (भवानी पेठ),
प्रदीप आव्हाड (बिबवेवाडी),
सुहास जाधव (कसबा-विश्रामबागवाडा),
इंद्रायणी कराचे (मालमता व व्यवस्थापन विभाग),
अस्मिता तांबे धुमाळ (करआकारणी व करसंकलन विभाग),
अमोल पवार (अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग) नियुक्ती करण्यात आली आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!