पुण्यात शनिवारी सायंकाळी मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे काही भागात रस्त्यांना नदीचे स्वरूप त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले..


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

पुण्यात पडलेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी नागरिकांची तारांबळ झाल्याचं दिसून आले.
याबाबत पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरुन या विषयीची सविस्तर माहिती घेतली. कमी वेळेत जास्त पाऊस पडल्यामुळे काही ठिकाणी पाणी साचले आहे, त्याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे.

या काळात नागरीकांनी शक्यतो घराच्या बाहेर पडू नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. नागरीकांनी काळजी घ्यावी. तसेच येत्या पाच दिवसात राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस जोरदार हजेरी लावणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याअनुषंगाने राज्यातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सतर्क राहण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.पुण्यात मुसळधार पाऊस

Advertisement

गेल्या दोन दिवसांपासून मॉन्सून दक्षिण कोकणात मुक्कामी होता. आज शनिवारी मात्र पोषक वातावरण तयार असल्याने पुणे जिल्ह्यात पावसाने मजल मारली आहे. त्यामुळेच पुण्यात सायंकाळनंतर जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसाचा जोर चांगलाच असल्याने रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पाण्याचा प्रवाह सर्वत्र वाहत असून, आकाश भरून आले आहे.

पुण्यावर उंच ढगांची निर्मिती सुरू असून कमी वेळात अधिक पाऊस झाल्याने काही ठिकाणी फ्लॅशफ्लड सारखी स्थिती आहे. तसेच झाडे पडणे, भिंती पडणे, घरांमध्ये पाणी शिरणे आदी घटना शक्य असून पाणी ओसरेपर्यंत घराबाहेर पडू नये.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!