(मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रतील 288 विधानसभाच्या जागांचा सर्वे करणार….
मुबंई प्रतिनिधी :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सारोसर्वा (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी 288 विधानसभा जागांचा सर्वे करणार असल्याने महाराष्ट्रात 288 विधानसभा जागे वर मनसे चे उमेदवार उभे राहिल्यास आश्चर्य वाटायला नको
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकही उमेदवार न उभा करता संपूर्ण पाठिंबा भाजपा महायुतीला दिला होता तसेच त्यांनी प्रचारसभा घेऊन धडाका उडवून दिला. असे असताना राज ठाकरे यांची मनसे विधानसभेत महायुतीचा धागा होणार का ? हे येणारा काळ ठरवेल असे दिसते ..
मनसेकडून विधानसभेच्या 288 जागांचा सर्वे करण्यात येत आहे. आत्तापर्यंत 88 जागांचा सर्वे रिपोर्ट प्राप्त झाला असून या जागांसाठी संभावित उमेदवारांच्या नावाची चाचपणी देखील सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. यावर विधानसभा निवडणुकीत नेमक्या किती जागांवर मनसे उमेदवार देणार? या बाबत माहिती देणे टाळले
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्व पक्षांनी आपापल्या पद्धतीने निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी (24जून) मुंबईत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. मनसे आगामी विधासभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजची बैठक असल्याचे राज ठाकरे यांनी यावेळी माहिती दिली.



