टायगर बुढा हो तो क्या हुआ, पंजा मारना नाही भुलता ….
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
महाराष्ट्रात लोकसभेच्या निवणुकीत महाविकास आघाडी ने बाजी मारून तब्ब्ल 30 जागा जिंकत विजयी सलामी दिल्याचे दिसते . महायुती ला 18 जगावर समाधान मानावे लागले..
लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांची पॉवर
राष्ट्रवादी फुटल्यानंतर 40 हून अधिक आमदार हे अजित पवारांसोबत गेले होते. असं असलं तरी लोकसभा निकाल लागल्यानंतर शरद पवारांना मोठं यश मिळालं. शरद पवारांनी 10 पैकी 8 खासदार हे निवडून आणले. तर दुसरीकडे अजित पवारांचा एकच खासदार निवडून आला. अजित पवार हे सुनेत्रा पवारांनाही निवडून आणू शकले नाहीत.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर झालेली ही पहिलीच निवडणूक. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांना मिळाल्यानंतर शरद पवार नवीन चिन्ह तुतारीसह निवडणुकीला सामोरं गेले. त्यातच अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात थेट त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच उतरवलं. मात्र अजित पवारांचा हा निर्णय पवार कुटुंबीयांसह बारामतीकरांनाही पटला नसल्याचं आता निकालातून दिसलं. सर्व नेते अजित पवारांसोबत, पण जनता मात्र शऱद पवारांसोबत असं चित्र दिसून आलं.
बारामती लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदारसंघ निहाय आकडेवारी
एकूण झालेले मतदान – 14 लाख 12 हजार 875
सुप्रिया सुळे एकूण मतदान – 7 लाख 32 हजार 312
सुनेत्रा पवार एकूण मतदान – 5 लाख 73 हजार 979
दौंड विधानसभा (राहुल कुल- भाजप)
सुप्रिया सुळे -92 हजार 64
सुनेत्रा पवार – 65 हजार 727
(लीड सुप्रिया सुळे 26 हजार 337)
इंदापूर (दत्ता भरणे- राष्ट्रवादी अजित पवार)
सुप्रिया सुळे – 1 लाख 14 हजार 20
सुनेत्रा पवार – 88 हजार 69
(लीड सुप्रिया सुळे 25 हजार 951)
बारामती ( अजित पवार)
सुप्रिया सुळे -1लाख 43 हजार 941
सुनेत्रा पवार – 96 हजार 560
(लीड सुप्रिया सुळे 47 हजार 381)
पुरंदर (संजय जगताप- काँग्रेस)
सुप्रिया सुळे -1लाख 25 हजार 948
सुनेत्रा पवार – 90 हजार 667
(लीड सुप्रिया सुळे 35 हजार 281)
भोर (संग्राम थोपटे- काँग्रेस आमदार)
सुप्रिया सुळे -1लाख 34 हजार 245
सुनेत्रा पवार – 90 हजार 440
(लीड सुप्रिया सुळे 43 हजार 805)
खडकवासला (भीमराव तापकीर- भाजप)
सुप्रिया सुळे – 1लाख 21हजार 182
सुनेत्रा पवार – 1लाख 41हजार 928
(लीड सुनेत्रा पवार 20 हजार 746)
बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये सुप्रिया सुळे यांनी एकूण मिळवलेले मताधिक्य – 1 लाख 58 हजार 333



