पुणे लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांचे पारडे जड…


      पुणे प्रतिनिधी :- पुणे लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांचे पारडे जड…
पुणे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र जवळजवळ स्पष्ट झाले आहे पहिल्यांदा एकतर्फी वाटणारे निवडणूक ही आता चुरशीशी झाली असल्याचे स्पष्ट होत आहे.

 

पुणे शहरात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांनी प्रचारात आघाडी घेऊन भाजपा , काँग्रेसच्या पोटात सूळ उमटला आहे. पर्वती कोथरूड , शिवाजीनगर , कसबा या विधानसभा मतदारसंघात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रचार रॅलीमध्ये सहभाग घेऊन प्रतिसाद दिला.
वसंत मोरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या कामाचा दाखला देत नागरिकांकडे मतदान करण्याचा आग्रह धरला. तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या सोशल इंजिनिअरिंग च्या माध्यमातून मी मराठा मी धनगर, मी माळी मी मुस्लिम अशाप्रकारे बोर्ड हाती घेऊन नागरिकांना वंचित बहुजन आघाडी ही सर्व जातीधर्माचे आघाडी असल्याचे दाखवून दिले. तसेच स्वतः वसंत मोरे मराठा समाजातून असल्यामुळे मराठा समाजाची मते ही वसंत मोरे यांना फायदा होताना दिसत आहे.

Advertisement

वंचितच्या वसंत मोरे यांचा सध्यातरी कार्यकर्त्यांच्या जीवावर प्रचार चालू आहे. त्यांच्यासाठी प्रकाश आंबेडकर हे एकमेव तोफ असणार आहे. ते पुढील काही दिवसात सभा घेणार असल्याचे सांगण्यात येते
वंचित बहुजन आघाडीचा फटका काँग्रेस व भाजपाला बसण्याची गणिते मांडली जात आहेत तरी मराठा उमेदवार देऊन वंचित ने भाजपाची कोंडी केली आहे. एकंदरीत पुण्यातील निवडणूक कोणत्याही पक्षासाठी सोपे राहिले नाही हे स्पष्ट आहे मतदानासाठी अद्यापही 10 दिवसाचा कालावधी बाकी आहे . त्यात मोदींची गॅरंटी की राहुल गांधी यांचा करिष्मा चालणार की प्रकाश आंबेडकर यांची सोशल इंजिनिअरिंग चालणार हे काळ ठरवेल…

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!