बाल विकास मंदिर शाळेत शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात
सासवड: येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल विकास मंदिर शाळेत शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात पार पडला.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये इयत्ता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. शाळेच्या प्रवेश द्वारावर रांगोळ्या काढल्या होत्या तसेच फुग्यांची सजावट केली होती.
प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. भाऊसाहेब बडधे , पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. मेघा जांभळे , शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ. सीमा काळे यांनी मेळाव्याचे उद्घाटन केले.शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी नावागतांचे आनंदाने स्वागत केले. प्राथमिक शिक्षण सुरु होण्यापूर्वी शिक्षणाची आनंददायी पद्धतीने पूर्वतयारी करून घेण्यासाठी हा मेळावा आयोजित केला होता.
या मेळाव्यात नोंदणी , शारीरिक विकास , बौद्धिक विकास, सामाजिक व भावनिक विकास , भाषा विकास, गणनपूर्व तयारी, पालकांना मार्गदर्शन असे ७ स्टॉल लावण्यात आले होते. या मेळाव्यात इ. पहिलीत प्रवेश घेतलेले १३६ विद्यार्थी सहभागी झाले होते.
या उपक्रमाचे संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, शाला समितीचे अध्यक्ष ॲड. सागर नेवसे, महामात्र सुधीर भोसले यांनी कौतुक केले.
यावेळी, मंजुषा चोरामले, आशा ढगे, शारदा यादव, शकुंतला आहेरकर, सुरेखा जगताप, माणिक शेंडकर, नरेंद्र महाजन, दीपक कांदळकर, संगीता कोल्हाळे, जयश्री काळाने, मनिषा जगताप, शितल चौधरी, मीना खोमणे, स्वाती बोरावके, अश्विनी कदम, माधुरी जगताप , विद्यार्थी , पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



