अल्पवयीन मुलाकडून भारती विद्यापीठ पोलिसांनी गावठी कट्टा व एक जिवंत राऊंड केले हस्तगत…
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
पुणे शहरात अल्पवयीन मुले शालेय शिक्षण घेण्याच्या वयात गुन्हेगारी कडे मोठया प्रमाणत आकर्षित होत असून त्यांच्या कडे पिस्टल, गावठी कट्टे, पालघन, तलवारी,कोयता अशी अनेक हत्यार घेऊन गुन्हेगारी कृत करीत आहे. असे असताना लहान मुलांना अश्या प्रकरा पासून अलिप्त राहण्यासाठी समाजामध्ये कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही. ही शोकांतिका म्हणावी लागेत. भारती विद्यापीठ पोलिसांनी अल्पवयीन मुलाला गावठी कट्टा व एक जिवंत राउंड घेऊन फिरत असताना पकडले..
दि.०९/०७/२०२५ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस स्टाफ हे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, नॅन्सी लेक होम सोसायटीकडुन लेकटाऊनकडे एक इसम गावठी बनावटीचा कट्टा घेवुन लेकटाऊनकडे जात आहे.
लागलीच पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व नमुद अंमलदार यांनी नॅन्सी लेक होम कडुन लेकटाऊनकडे जाणाऱ्या रोडवर जावुन बातमी प्रमाणे इसमाचा शोध घेतला असता स्व. शंकरराव राजाराम कदम स्वीमींग टँक समोरील बाजुचे रोडवर एक विधीसंघर्षीत बालक, हा त्याचे ताब्यात ५०,०००/- रुपये किंमतीचे एक गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत काडतुस असा एकुण ५०,५००/- रुपयांचे मुद्देमालासह दिनांक ०९/०७/२०२५ रोजी मिळुन आल्याने त्याचेकडुन सदरचा मुद्देमाल हस्तगत करुन त्याचेविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, श्री. राजेश बनसोडे मा. मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ श्री. मिलींद मोहीते, मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, व तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे.




https://shorturl.fm/08ZYC