पुणे शहरात गांजा, अमली पदार्थ, गुटखा बंदी कायदा नावालाच, शहरात खुलेआम होतेय विक्री…
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
महाराष्ट्र सरकारने गेल्या अनेक वर्षापासून अमली पदार्थ विरोधी कायदा, गुटखा बंदी कायदा अस्तित्वात असताना, गांजा, आमली पदार्थ, गुटखा विक्री होत असताना पुणे शहरात अवैधरित्या विक्री सर्रास चालू आहे. पुणे शहरात गांजा, अमली पदार्थ, तंबाखू, गुटखा विक्री बंदीचा कायदा नावालाच दिसून येत आहे. शहरांसोबत गावागावांत खुलेआम पानटपऱ्यांवर तंबाखू व गुटख्याची विक्री होत आहे. एवढेच नव्हे तर शाळा परिसरालगत ही दुकाने खुलेआम सुरू आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासन धडक मोहीम राबविणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा, 1985 हा भारताच्या संसदेचा एक कायदा आहे. या कायद्याला सामान्यतः NDPS कायदा म्हणून ओळखले जाते. या कायद्यानुसार, अंमली पदार्थांचे उत्पादन, विक्री, खरेदी, वाहतूक, साठवणूक आणि उपभोग करणे बंदी आहे. तसेच महाराष्ट्र राज्यात २० जुलै २०१२ रोजी गुटखा बंदीचा निर्णय झाला. त्याला तेरा वर्षे पूर्ण झाली; पण ना त्याची कडक अंमलबजावणी झाली, ना गुटखा विक्री थांबली. शहर किंवा ग्रामीणमधील पानटपरी, दुकानांमध्ये गुटख्याची विक्री होत आहे. गुटखा विक्री होत असतानाही कारवाई होताना दिसत नाही. आंतरराज्यीय सीमांवर पोलिसांचे तपासणी नाके असतानाही गुटखा येतोच कसा, या प्रश्नाचे ठाम उत्तर अधिकारी देऊ शकत नाहीत.
शहरामध्ये इतर राज्यांतून मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्रीला येतो. गुटखा बंदीनंतर अनेकांनी मावा विक्रीचा नवा व्यवसाय सुरू केला. त्यातूनच गुटख्याची विक्री सुरुवातीला चोरून केली जात होती. आता सर्रासपणे केली जात आहे. तरुणांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवून निरोगी, सदृढ समाजाच्या निर्मितीसाठी गांजा, अमली पदार्थ, हातभट्टी दारू, गुटखा, मावा विक्रीवर कडक निर्बंध लावण्यात आले; पण शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे कायद्याचे पालन होत नाही. जिल्ह्यात शहरच नव्हे, तर ग्रामीण परिसरात गुटखा विक्री सर्रासपणे पानटपरी, दुकानांमध्ये होते. गुटखा विक्रीसाठी व्यापाऱ्यांची मोठी साखळी कार्यरत आहे. ही साखळी तोडल्यानंतरच अमली पदार्थ, गांजा, गुटखा विक्री कमी होण्यास मदत होणार आहे. कारवाईची धडक मोहीम हाती घेणे गरजेचे आहे.
पुणे शहरात गुटखा विक्री साखळी पद्धतीने होत असून होलसेल विक्री करणाऱ्या दुकानदार नावे पुढील प्रमाणे
① मिथुन नवले :- (नाना पेठ मिथुन ट्रेडर्स)
(2) जोग माया :- (ट्रेडर्स नाना पेठ)
(१) बालाजी करली (गंगा धाम मार्केट यार्ड)
⑤ सुरेख ट्रेडर्स (नाना पेठ)
शमिना आन्सारी उमरान ची आई (भवानी पेठ )
⑥ शोहेब आन्सारी (गुलटेकडी खड्डा )
नमिज आन्सारी (गुलटेकडी खड्डा )
(८) जहिर आन्सारी (गुलटेकडी – लोहिया नगर
⑨ आमीन आन्सारी (लोहिया नगर)
पवन तिवारी – ( फुले मंडई हिना वाईन समोर )
① आरिफ आन्सारी :- (कोंढवा खु. शिवनेरी नगर)
पुणे शहरात गांजा,अमली पदार्थ ही बऱ्याच ठिकाणी विक्री होते 1) कोंढवा खु.शिवनेरी नगर 2) कोंढवा खु. कमेला 3) दांडेकर पूल सिहंगड रोड 4) उंद्री युरो स्कूल शेजारी
या ठिकाणी अमली पदार्थ गुटखा विक्री होत असताना पोलीस प्रशासनाला माहित कसे नाही हे कळत नाही.या अवैध व्यवसायात असलेल्या कंपन्यांच्या मालकांना व मुख्य सुत्रधारांना सुत्रधारांना शोधून थेट त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याने शालेय विद्यार्थी, व तरुण गुटख्यांच्या दुष्परिणामापासून वाचतील, असा विश्वासही सामान्य नागरिक व्यक्त करतात..



