धनकवडी क्षेत्रीय कार्यालयात असणाऱ्या भ्रष्टाचार रुपी वळू ला लगाम घालणार कोण…
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
पुणे महानगरपालिकेच्या धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या घनकचरा, आरोग्य विभागात ASI,DSI, मुकादम यांनी कर्मचाऱ्यांना घरी बसून पगारी देणे (बंदघर )प्रकरण. स्वयंभू ट्रान्सपोर्ट चे आकाश टेकावडे यांच्या काडून मलई. स्वच्छ संस्थेच्या सेवकांना पैसे मागणे, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची सीमा ओलांडली असताना सहाय्यक आयुक्त धनकवडी क्षेत्रिय कार्यालय, उपायुक्त आशा राऊत यांनी न चैकशी न कारवाई बग्याची भूमिका घेतली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या धनकवडी क्षेत्रीय कार्यालयात अधिकारी व उपायुक्त आशा राऊत यांना तक्रार देऊन ही कारवाई होत नसल्याने या वळू ला लगाम घालणार कोण?
सदर तक्रार अशी आहे की स्वच्छ संस्थेच्या संयमसेवी कचरावेचका लक्ष्मण कांबळे हे स्वच्छ संस्था मधे गेली अनेक वर्ष स्वयंमसेवक म्हणून धनकवडी क्षेत्रिय कार्यालय याठिकाणी मुकादम भैरू रणदिवे यांच्या आरोग्य कोटी कार्यरत होते लक्ष्मण कांबळे यांना पारितोषिक ही मिळाले होते त्यांनी ढकल गाडी ऐवजी कर्ज काडून टेम्पो घेतला त्यानंतर जादा घर मिळाले त्यामुळं जास्त पैसे मिळू लागले त्यानंतर ASI ढसाळ हे बदली होऊन आले. त्यांनी जास्त पैसे मिळत असल्याने मुकादम, ASI यांनी सांगणमताने 5000 रुपये ची केली त्यांना 5000 रुपये दिले ही.त्यानंतर वारंवार मागणी होऊ लागल्याने पैसे देण्यास नकार दिला असता संबंधित अधिकाऱ्यांनी ड्रायव्हर ला हाताशी धरून कचाऱ्याने भरलेली गाडी खाली करण्यास खाली करण्यास मनाई करण्यात आली. संबंधित वरिष्ठ अधिकारी स्वच्छ संस्थे कडे तोंडी तक्रारी केल्या असताना एक महिना भरून ही गाडी खाली केली नाही व कामावरून काडून टाकले. संबंधित लक्ष्मण कांबळे यांच्या वर कर्ज झाले आहे. असे असताना पीडित लक्ष्मण कांबळे यांनी लेखी तक्रार ग्राहक हक्क संघर्ष समिती या संस्थे कडे दिली आहे धनकवडी क्षेत्रीय कार्यालयात स्वच्छ संस्थे च्या सेवकांकडून घरोघरी कचरा घेण्यासाठी 5000 रुपये घेतले जातात अशी तक्रार ग्राहक हक्क संघर्ष समिती कडे आल्याने चैकशी केल्या नंतर खरोखर स्वछ सेवकांकडून 5000 रुपये ची मागणी मुकादम भैरू रणदिवे व ASI ढसाळ यांच्या काडून केली असल्याची माहिती मिळाली या संदर्भात संबंधित अधिकाऱ्या कडून ना चौकशी ना कारवाई करण्यात असमर्थ असल्याने मा.आयुक्त राजेंद्र भोसले कारवाई करणार का ?

