पुणे शहरात नगररोड क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत अनाधिकृत होल्डिंगला प्रशासनाकडून अभय….
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स, किऑक्स आढळून आल्यास त्यावर महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकांकडून कारवाई केली जात आहे. पण पुणे महानगर पालिकेच्या नगर रोड क्षत्रिय कार्यालयाच्या अधिकाऱ्याकडून अनधिकृत होल्डींग ला अभय दिले जात आहे. पुणे महानगर पालिकेचा कोट्यवधी रुपये चा महसूल नगर रोड क्षेत्रिय कार्यलय काडून बुडावला जातो तब्ब्ल 50 ते 70 होल्डिंग नियमबाह्य पद्धतीने उभे केले असल्याचे दिसत आहे..

Advertisement
महाराष्ट्र शासनाने अनाधिकृत होल्डिंग संदर्भात नियमावली जारी केली असताना नगर रोड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असणाऱ्या पुणे नगर रोड अनधिकृत होर्डिंग,लागलेली दिसत आहेत.
अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स, किऑक्स आढळून आल्यास थेट क्षेत्रीय अधिकार्यांना फोन करा, असे आवाहन महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त राजू नांदकर व नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संजय पोळ यांच्या कडे तक्रार केल्या नंतर तात्काळ कारवाई होणे अभिप्रत असताना तक्रार करून ही कारवाई होत नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते मा आनंद राजहंस यांनी सांगितले.
नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संजय पोळ साहेब यांनी सांगितले की क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत असणाऱ्या अनधिकृत होल्डिंग माहिती घेऊन अनधिकृत होर्डिंग, वर कारवाई करणार असल्याचे सांगितले…



