दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकास दिली कारावासाची व दंडाची शिक्षा…


प्रतिनिधी पुणे :- मिलिंद राजहंस

पुणे शहरात दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांची संख्या मोठी आहे. वाहतूक विभाग,पुणे पोलीस प्रशासन अश्या तळीरामांना जाग्यावर दंड वसुल करून पुढे दारू पिऊन गाडी चालवणार नाही याची ताकीद देऊन सोडून देतात. तरी ही अनेक तळीराम सर्रास दारू पिऊन गाडी चालवताना दिसतात या नाहक एखाद्या नागरिकाचा बळी जातो.अपघातात स्वतःही जखमी, मृत्यू होतात. असे असताना अश्या तळीरामावर दंड व शिक्षा होणे गरजेचे आहे. या बाबत पुणे शहरातील कोथरुड वाहतूक विभागाकडुन झाली असून मोटार वाहन न्यायालय शिवाजीनगर पुणे यांनी आरोपी नामे रब्बीन रमजान शेख वय-२९ वर्षे रा. जनवाडी याला शिक्षा व दंड झाला

पुणे शहरातील कोथरुड वाहतूक विभागाकडुन दि. ०३.०८.२०२४ रोजी आरोपी नामे रब्बीन रमजान शेख वय-२९ वर्षे रा. जनवाडी पुणे याचेवर खटला क्र. १९७८/२०२४ मोटार वाहन कायदा कलम १८४,१८५,३/१८१ सेशन केस नं. १६८३९७/२०२४ अन्वये खटला दाखल करण्यात आला होता.

Advertisement

दि. ०५.०२.२०२५ रोजी मा. न्यायाधीश श्री बिराजदार साो, मोटार वाहन न्यायालय शिवाजीनगर पुणे यांनी सदर खटल्यामध्ये आरोपी नामे नामे रब्बीन रमजान शेख वय-२९ वर्षे रा. जनवाडी पुणे यास ५ दिवसाची साधी कैद व २०,०००/- रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

पुणे वाहतूक विभागकडून 2020 ते 2025 पर्यत कालावधीत एकूण 6554 केसेस दाखल झाल्या
सन. २०२१ – एकुण ६९, सन २०२२- एकुण ३७, सन २०२३ – एकुण ५६२, सन २०२४ -एकुण ५२९३, सन २०२५ (५ फेब्रुवारी पर्यंत) एकुण ५९३

अनेक नागरिक वाहतूक विभागाच्या सूचना कडे दुर्लक्ष करतात दंड फाडायला ही तयार असतात आपला हेका न सोडता परत दारू पिऊन गाडी चालवण्यात प्रतिष्ठा समजतात पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई कारणे गरजेचे आहे…
मा अमोल सूर्यवंशी
ग्राहक हक्क संघर्ष समिती अध्यक्ष वाहतूक शाखा

 

नमूद कामगिरी मा. श्री मनोज पाटील, अपर पो आयक्त, मा. श्री अमोल झेंडे, पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा मा. सहाय्यक पोलीस आयुक्त नंदिनी वग्यानी वाहतूक शाखा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी खटला विभाग/येरवडा विभाग, पोलीस निरीक्षक थोपटे, पोउनि पाटील कोर्ट, खटला विभागाचे अंमलदार, कोर्ट अंमलदार यांनी खटल्याचे कामकाज केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!