थकीत मिळकत कर वसुल करण्यासाठी पुणे महानगर पालिका आक्रमक…


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

मिळकत कर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्वाचा स्रोत असून, त्यातूनच शहरातील विकास कामे होत असतात. कर आकारणी व कर संकलन खात्यास सन २०२४-२५ मध्ये दिलेले मिळकत कर जमा करण्याचे उद्दीष्ट पुर्ततेसाठी थकवाकी वसूलीवर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. थेट थकीत मिळकत कर वसुल करण्यासाठी पुणे महानगर पालिका आक्रमक भूमिका घेतली असून मिळकत कर थकबाकीदारांचे नळजोड तोडण्यात येणार आहे…

त्या अनुषंगाने दि. २/१२/२०२४ पासून मिळकत कर वसुलीसाठी ५ पथके तयार करण्यात आली असून, त्यांचे मार्फत दररोज निवामी, बिगर निवासी थकबाकीदार मिळकतीना भेटी देऊन मिळकतकर वसूलीची कारवाई करण्यात येत आहे.

त्यानुषंगाने दि. ०२/१२/२०२४ पासून मिळकत कर बमुलीसाठी ५ पथके तयार करण्यात आली असून त्यांचे मार्फत दररोज निवामी, बिगर निवासी थकबाकीदार मिळकतीना भेटी देऊन मिळकत कर वसुलीची कारवाई करण्यात येत आहे. आज मितीस र.रु.७१,४१,८५,३९३/- एवढी मिळकतकराची थकबाकी या पथकाद्वारे वसूल करण्यात आली आहे.

Advertisement

परंतू अद्यापही नागरीकांचा/व्यावसायिकांचा मिळकतकर भरण्याकडे कल दिसून येन नाही. त्या अनुषंगाने उद्या दि १/१/२०२५ रोजी पासून मध्यवर्ती वसूली पथकांसोबत १ प्लंबर, ३ विगारी सेवक व त्या-त्या विभागातील विभागीय निरीक्षक व पेठ निरीक्षक तमेच प्रत्येक झोन निहाय एकूण ५ पथके यांचे मार्फत थकबाकीदार मिळकतीचे नळजोड तोडण्याची कार्यवाही करण्यात येणार असून मिळकत कराच्या थकबाकीची रक्कम पूर्णपणे भरल्या नंतरच सदरचे नळजोड पूर्ववन करण्यात येणार आहेत.

तरी सर्व निवासी/बिगर निवासी मिळकतधारकांस याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी मिळकत कराची थकबाची त्वरीत भरून नळजोड नोडण्याची कारवाई टाळावी व प्रशासनास मिळकतू कराचे उदिष्ट साध्य करणेसाठी सहकार्य करावे असे आव्हान पुणे महानगर पालिके काडून करण्यात आले….

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!