बेकायदेशीर देशी गावठी कट्टा (अग्निशख) व ०१ जिवंत काडतुसे बाळगणारे बिबवेवाडी पोलीसांच्या जाळयात
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस विधानसभा निवडणुकीत घातपात घडवण्याच्या इराद्याने पिस्टल गावठी कट्टे सापडत असल्याने पुणे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच अनुषंगाने बिबेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत अंतर्गत गावठी कट्टा व एक पिस्टल सापडल्याने घातपात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दि. १६/११/२०२४ रोजी बिबवेवाडी पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक अशोक येवले, पोलीस अमंलदार असे स्टाफसह बिबवेवाडी पोलीस ठाणेचे हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार अभिषेक थुमाळ यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक पांढरे रंगाचा टी शर्ट व काळे रंगाची जिन्स पॅन्ट घातलेला इसम कुंभारवाडा जवळ चिंचचेझाडा खाली बिबवेवाडी पुणे येथे कोणाची तरी वाट पाहत थांबलेला आहे त्याचे कमरेस एक पिस्टल सदृश्य हत्यार लावुन कोणतातरी गंभिरस्वरुपाचा गुन्हा करण्याचे इराध्याने फिरत असल्याबाबत बातमी मिळाल्याने सदर बातमी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकर साळुंखे बिबवेवाडी पो स्टे व मा. पोलीस निरीक्षक गुन्हे मनोजकुमार लोंढे यांचे यांना सांगितलेनंतर त्यांचे मार्गदर्शनाखाली
सदर आरोपी इसम नामे निलेश श्रीकांत गायकवाड, वय २२ वर्षे, रा. गणेशनगर लेन नं.०१, महमदवाडी हडपसर पुणे. यास ताब्यात घेवुन त्याची पंचासमक्ष अंगझडती घेता त्याचेकडे २५,०००/- रुपये किंमतीचे एक लोखंडी धातुचे गावठी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्र) व ५००/- रुपये किंमतीचे ०१ जिवंत काडतुस मिळुन आले आहे. सदर इसमाविरुध्द पोलीस अंमलदार अभिषेक धुमाळ यांनी बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने तो बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं.२७६/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) सह महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करुन आरोपीस दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. तसेच नमुद आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर यापुर्वी दरोडा, दुखापतीचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार, मा.सह पोलीस आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा, मा.अप्पर पोलीस आयुक्त श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त श्री आर राजा, परिमंडळ ५ पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री मनोजकुमार लोंढे, तपासपथकातील अधिकारी पोलीस उप निरीक्षक श्री अशोक येवले, पोलीस हवालदार संजय गायकवाड, संतोष जाधव, पोलीस अमंलदार, अभिषेक धुमाळ, आशिष गायकवाड, शिवाजी येवले, सुमित ताकपेरे, विशाल जाधव, ज्योतिष काळे, प्रणय पाटील व अजय कामठे यांनी केली आहे.



