पार्वती मतदार संघात आबा बागुल यांच्या हिऱ्याला स्वारगेट महर्षी नगर परिसरात मोठा प्रतिसाद…
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस विधानसभा निवडणूकीचा शेवटचा टप्पा चालू असून पार्वती मतदार संघात आबा बागुल यांच्या हिऱ्याला स्वारगेट महर्षी नगर परिसरात मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. पायाभूत सुविधांची व्याप्ती वाढविताना सद्यःस्थितीत भेडसावणाऱ्या समस्यांतून नागरिकांची सुटका करून त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी ‘विकासाची दशसूत्री’ हा जाहीरनामा निश्चितच आधारवड ठरणार आहे. त्यामुळे येत्या बुधवारी दि. २० नोव्हेंबर रोजी ‘हिरा’ निशाणीसमोरील बटन दाबून विजयी करा, असे आवाहन अपक्ष उमेदवार आबा बागूल यांनी केले.

पर्वती विधानसभा मतदारसंघ हा सर्व वर्गातील नागरिकांचा विभाग आहे. मात्र, येथे गोरगरीब नागरिकांना वैद्यकीय उपचार घेण्यासाठी आवश्यक असलेली रुग्णालये नाहीत. गेली पंधरा वर्षे येथे विकास थांबला आहे, त्यामुळे येत्या पाच वर्षांत पर्वती मतदारसंघात तीन अत्याधुनिक सुविधा असलेले व गोरगरिबांना परवडेल अशी रुग्णालये उभारण्यात येतील, असे आश्वासन अपक्ष उमेदवार आबा बागूल यांनी नागरिकांना दिले.
बागूल म्हणाले की, गत दहा वर्षांत विकासाबाबतीत मतदारसंघाची वाताहत झाली. त्यामुळे वाहतूक, शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते, सुरक्षितता, कचरा, रोजगार, महिला सक्षमीकरण, पर्यावरणावर आधारित ‘विकासाची दशसूत्री जाहीरनामा मतदारसंघाच्या विकासाला दिशा देणारा आहे पाच वर्षांत त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होणार आहे
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शहरांतर्गत रिंगरोड, बीआरटी मार्गावर भुयारी मार्ग, ग्रेडसेपरेटर उभारणी, मुबलक व समान पाणीपुरवठ्यासाठी ऑनलाइन बॉटर डिस्ट्रिब्युशन सिस्टिम, दर्जेदार शिक्षणासाठी नावाजलेल्या राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलच्या धर्तीवर पाच शाळांची उभारणी, आधुनिक अभियांत्रिकी महाविद्यालय, निरामय आरोग्यासाठी रुग्णालये या कामांचा समावेश असल्याचे बागूल यांनी सांगितले.



