महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस चे उमेदवार अश्विनी नितीन कदम यांच्या प्रचार रॅली ने विरोधकांच्या मनात धडकी..
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
बिबवेवाडी ओटा परिसरात प्रचार रॅली काडून विरोधकांच्या मनात धक्का दिला रॅली मधे हजारो महिला सहभागी झाल्या बिबावेवाडी परिसर अश्विनी ताई आगे बडो,हम तुम्हारे सात है,च्या घोषणाने परिसर दानाणून सोडला शिवसेनेचे कायकर्ते अमोल रासकर यांनी प्रचार रॅली चे आयोजन करून जेसिबी द्वारे हार घालून उमेदवार अश्विनी नितीन कदम यांचे स्वागत केले.

तसेच महाविकास आघाडी तील विविध पक्ष संघटना यांनी सहभाग घेतला शिवसेना नगरसेवक बाळासाहेब ओसवाल सचिन जोगदंड , शशीकांत पापळ तसेच काँग्रेस पक्षाचे अभय जी छाजेड, बंडू नलावडे, चंद्रकांत सोनकांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) गट, राष्ट्रवादी काँग्रेस (पवार गट )चे असंख्य कार्यकर्ते मोठया प्रमाणत सहभागी झाले.
अश्विनी ताई नितीन कदम यांनी बिबवेवाडी परिसरात स्थानिक आमदार यांनी गेली 15 वर्षात हिलटॉप हिल्सलोप उठवता आला नाही. तसेच स्थानिक प्रश्नाकडे दुर्लक्ष केले,वाहतूक कोंडी नित्याची झाली स्वामी विवेकानंद रोड गेल्या 10 वर्षांपासून चालू असून कधी पूर्ण होणार की नाही हे सांगता येत नसल्याचे सांगितले, बिल्डर धन दंडग्याच्या फायद्यासाठी काम करत असल्याचे सांगितले. आता बदल करायचा असल्याने तुतारी वाजवणाऱ्या माणूस चिन्हवरील आपले बहुमूल्य मत देऊन विजयी करावे असे आव्हान केले..



