अंमली पदार्थ विरोधी पथका ने तब्बल १०,८४,७१६ रुपये किमतीचा गुटखा केला जप्त…


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

सरकारने महाराष्ट्रत गुटखा, प्रतिबंधित पान मसाला व तंबाखुजन्य पदार्थ विक्री बंदी असताना पुणे शहरात रस्तोरस्ती गुटखा, प्रतिबंधित पान मसाला प्रतिबंधित सिगारेट सर्रास विकले जातात कोणाचाही धाक या राहिलेला नाही असे दिसते पुणे शहरात वारंवार गुटखा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यां विरुद्ध पोलीस व FDA कारवाई करतात तरी ही गुटखा,प्रतिबंधित सिगारेट सर्रास मिळताना दिसतात..

दि.३०/०९/२०२४ रोजी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाणेच्या परीसरात पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार आझाद पाटील यांना मिळालेले बातमीनुसार श्रीराम अपाटमेन्ट, शॉप नंबर २,१०३ रास्ता पेठ, पुणे येथे १) मुदसर इलियास बागवान वय ४० वर्षे, रा. गल्ली नं ५, भाग्योदयनगर, कोंढवा पुणे २) अन्वर शरफुदिदन शेख, वय ३८ वर्षे, रा सदर यांच्या ताब्यातुन एकुण १०,८४,७१६/-रू किं.चा प्रतिबंधीत पान मसाला व तंबाखु जप्त करण्यात आला असुन नमुद आरोपींविरुध्द समर्थ पोलीस स्टेशन गु.र.नं.२०९/२०२४, भा.न्या.सं. कलम १२३,२२३,२७४,२७५ सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य उत्पादन पुरवठा व वितरण यांचे विनीमय) अधिनियम कलम ७ (२) व २० (२) अन्न सुरक्षा मानके अधिनियम कलम २००६, चे कलम २६ (२) (i) (iv) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

वरील नमुद कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उप-निरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार आझाद पाटील, योगेश मांढरे, चेतन गायकवाड, संदिप जाधव, उदय राक्षे, दिशा खेवलकर, सय्यद साहिल शेख, संदिप शेळके, युवराज कांबळे, अझिम शेख, नितीन जगदाळे, प्रशांत बोमादंडी, मयुर सुर्यवंशी, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!