पुणे शहर पोलीस दलाने केला गणेशोत्सवाच्या निमित्ताने विशेष बंदोबस्त…


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

पुणे शहरात देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन बुधवारपासून (११ सप्टेंबर) शहराच्या मध्यभागातील प्रमुख रस्ते सायंकाळी पाचनंतर वाहतुकीस बंद करण्यात येणार आहेत. लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता वाहतुकीस बंद केले जाणार आहेत.

तसेच गणेशोत्सवाच्या निमित्ताने गुन्हे शाखा पुणे शहर यांच्या मार्फतीने नेमण्यात आलेला गुन्हे प्रतिबंधक बंदोबस्त*

गुन्हे प्रतिबंध बंदोबस्त **मा.पोलीस उपायुक्त श्री निखिल पिंगळे* यांच्या पर्यवेक्षणाखाली कार्यरत *सहप्रभारी सहाय्यक पोलीस आयुक्त श्री गणेश इंगळे* व *नवनियुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त श्री राजेंद्र मुळीक* यांच्या मार्फतीने पार पाडला जाणार आहे. या बंदोबस्त मध्ये गुन्हे प्रतिबंध करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची पथक निर्माण करण्यात आलेली आहेत.

परिमंडळ १ विशेष बंदोबस्त*

*परिमंडळ १* म्हणजे ज्या ठिकाणी मुख्य शहरातील मुख्य गणेशोत्सवाचे मंडळ तसेच विसर्जनाचे प्रमुख मार्ग असणार आहेत त्या ठिकाणी लावलेला बंदोबस्त हा खालील प्रमाणे –

1. *पोलीस निरीक्षक उल्हास कदम* यांच्या समवेत आठ अंमलदार
2. *पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई* यांच्यासमवेत आठ अंमलदार
3. *पोलीस निरीक्षक संदिपान पवार* यांच्या समवेत आठ अंमलदार

परिमंडळ एक मध्ये *पोलीस स्टेशन निहाय अँटी चेन स्नाचींग पथक*
1. *खडक* पोलीस स्टेशन पोलीस *उपनिरीक्षक श्री कोकाटे* यांच्या समवेत दोन अंमलदार.
2. *समर्थ* पोलीस स्टेशन *पोलीस उपनिरीक्षक श्री देव* यांच्या समवेत दोन अंमलदार
3. *डेक्कन* पोलीस स्टेशन *पोलीस उपनिरीक्षक बारगोडे* यांच्यासोबत दोन अंमलदार

*अँटि-चेन स्नेचींग व मोबाईल चोरी विशेष पथक*
1. दोन पथकांचे नेतृत्व *सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अनिकेत पोटे*
2. पथक एक चार अंमलदार
3. पथक दोन चार अंमलदार

Advertisement

महिला व बाल सुरक्षा विशेष पथक* बंदोबस्तात दामिनी पथक खेरीज काम करणारे हे वेगळे पथक राहील.
1. *सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे* हे नेतृत्व करतील

परिमंडळ दोन यांचे अख्यातरितले गुन्हे प्रतिबंध करिता विशेष पथक*
परिमंडळ दोन या ठिकाणी गुन्हे प्रतिबंध करिता पोलीस निरीक्षक *श्री प्रताप मानकर* यांच्या समवेत आठ अमलदारांचे पथक कार्यरत राहील .

*महत्वाचे गणपती व गर्दीची ठिकाणे याठिकाणी गुन्हे प्रतिबंध करिता देण्यात आलेला गुन्हे शाखेच्या विशेष मनुष्यबळ*
गुन्हे शाखेमार्फत विशेष प्रयोजन म्हणून
1. कसबा गणपती मंडळ
2. तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळ
3. तुळशीबाग मंडळ
4. गुरुजी तालीम मंडळ
5. केसरी वाडा मंडळ
6. दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ
7. बाबू गेनू मंडळ
8. जिलब्या मारुती मंडळ
9. भाऊ रंगारी मंडळ आणि
10. मंडई येथील मंडळ
यांच्यासाठी दोन अमलदारांचे विशेष पथक प्रत्येकी नेमण्यात आलेले आहे .

*पोलीस मदत केंद्रावर देण्यात आलेला गुन्हे प्रतिबंध व फर्स्ट रिस्पॉन्स मनुष्यबळ*
दिनांक 7. 9 .2024 ते दिनांक 18. 9 .2024 रोजी पर्यंत गणेशोत्सव कालावधीमध्ये उभारण्यात आलेल्या *पोलीस मदत केंद्रावर* प्रत्येकी दोन अंमलदार हे गुन्हे प्रतिबंध तसेच गुन्हे फर्स्ट रिस्पॉन्स याकरिता देण्यात आलेले आहेत. हे मदत केंद्र खालील प्रमाणे

1. कै. काका गाडगीळ पुतळा चौक
2. जिजामाता चौक
3. फडके हाऊद चौक
4. बुधवार चौक
5. रामेश्वर चौक
6. सोन्या मारुती चौक
7. मंडई चौक
8. शनिपार चौक
9. अप्पा बळवंत चौक
10. बीएसएनएल ऑफिस बाजीराव रोड
11. गणपती चौक
12. ए डी कॅम्प चौक
13. इनामदार चौक
14. कसबा पोलीस चौक
15. शुक्रवार पेठ पोलीस चौकी
16. मंडई पोलीस चौकी
17. पेरुगेट पोलीस चौकी
18. शनिवार पेठ पोलीस चौकी
19. नारायण पेठ पोलीस चौकी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!