लोणीकंद पोलीस ठाण्याच्या ह‌द्दीतील तीन गावठी हातभट्टी दारुच्या भट्या नष्ट करून दोन महिला एक पुरुष अटक…


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

लोणीकंद पोलीसांचा एकाच दिवशी मौजे तुळापुर व भावडी परिसरातील एकुण ०३ गावठी हातभट्टी दारु विक्रेत्यांवर छापा टाकून हातभट्टीची गावठी तयार करणाऱ्या भट्या दारु नष्ट करुन त्यांचेविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

मौजे भावडी गावचे हद्दीत गट नंबर २६५ येथील कैलास हांडगर यांचे शेतालगत अर्धवट बांधकाम असलेल्या घराचे मागे मोकळ्या जागेत चालु असलेल्या हातभट्टीवर कारवाई करुन एकुण ३,७२,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यामध्ये गावठी दारु तयार करण्यासाठी लागणारे रसायन, गावठी तयार दारु व इतर साहित्य नष्ट करुन महिला नामे मंदाबाई जंगलु गुडावत, रा. ५ नंबर, भावडी रोड, ता. हवेली, जि. पुणे हिचेविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.तसेच मौजे तुळापर, नागरमल वस्ती या ठिकाणी महिला नामे हिराबाई कांताराम भिडे, रा. सदर हिचेविरुध्द त्याचप्रमाणे मौजे तुळापुर येथील शिवले वस्ती या ठिकाणी इसम नामे ईश्वर नामदेव जठार, रा. सदर यांचेविरुध्द कायदेशिर कारवाई करुन त्यांचे ताब्यातुन एकुण १५००/- रुपये किंमतीची हातभट्टीची गावठी तयार दारु नष्ट करुन त्यांचेविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

Advertisement

ग्रामीण भागामध्ये गावठी हातभट्टी दारुचे अवैध धंदे चालु असल्याच्या असल्याबाबत महिती मिळाल्याने सदर बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सावळाराम साळगांवकर यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार दिनांक २८/०७/२०२४ रोजी लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, गुन्हे श्री. निलेश जगदाळे यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे व पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल यांच्या दोन टिम तयार करुन त्यांना योग्य ते निर्देश देउन पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गावठी दारु विक्री करणा-यांवर कारवाई करणेकामी रवाना केले होते.

सदरची कामगिरी, मा. पोलीस उप-आयुक्त, परि. ४, पुणे शहर, श्री. विजयकुमार मगर मा. सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग, श्री. विठ्ठल दबडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस ठाणेचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सावळाराम साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. निलेश जगदाळे, तपास पथकाचे सपोनि रविंद्र गोडसे, पोउपनिरी मनोज बागल, पोलीस अंमलदार विनायक साळवे, कैलास साळुंके, सागर जगताप, अमोल ढोणे, साईनाथ रोकडे, शुभम चिनके, परमेश्वर आघाव, महिला पोलीस अंमलदार राणी मोटे, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!