पुणे महानगरपालिका व पुणे शहर वाहतूक शाखा मिळून वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा देण्यासाठी गुगल सोबत वैशिष्टपूर्ण करार…
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
पुणे शहरातील नागरिकांचे वाहतूक कोंडीतुन सुटका व वाहतूक वेळ कमी करण्यासाठी शहरातील वाहतूक वाहिन्या असलेल्या मुख्य ३२ रस्त्यांवर चौक सुधारणा, पार्किंग मॅनेजमेंट, वाहतूक नियंत्रण साधने, वाहतूक विलगीकरण टेक्नीक्स इ. माध्यमातुन अभिनव योजना राबवण्यात येणार आहे. यामध्ये गुगल बरोबर करार करुन वरील सुधारणा करण्यात येणार आहेत. वाहतूक शाखा व पुणे महानगरपालीका यांचे समन्वयातुन एक अॅप्लीकेशन तयार करण्यात येणार असुन याद्वारे ट्रॅव्हल टाईम कमी करणे तसेच पुणे शहरातील रस्त्यांची कॅरींग कॅपेसिट वाढवण्यात येणार आहे. असे अप्पर पोलीस आयुक्त पुणे शहर मा .मनोज पाटील व पुणे महानगर पालिकेचे श्री अनिरुद्ध पावसकर यांनी पत्रकार परीषदेत सांगितले …
प्रोजेक्ट कामी निवडलेले मुख्य रस्ते हे शहरातील जास्तीत जास्तीत वाहतूक असणारे रस्ते आहेत. या मुख् रस्त्यांवर वाहतूकीची गती संथ असेल अथवा या रस्त्यावर जर वाहतूक कोंडी होत असेल तर त्याचा ताण शहरातील अंतर्गत रस्त्यांवर येतो त्यामुळे नागरिकांना शहरातील अंतर्गत निवासी रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा सामना कराव लागतो. या मुख्य रस्त्यांवरील वाहतूकीचा वेग वाढवण्यासाठी या रस्त्यावर चौक सुधारणा, अद्ययावत सिग्नल यंत्रण पार्किंग मॅनेजमेंट, स्पिड ब्रेकर्स, रस्त्याची सरफेसींग, रस्त्यावरील अतिक्रमण काढणे, रस्त्यावर वाहतूक नियंत्रणाच साधने बसवणे, रस्त्यामधील मिर्सीग लिंक्स पुर्ण करणे, रस्त्यावरील वॉटर लॉगींग पॉईंटस दुरुस्त करणे, या रस्त्यांक नो हॉकर्स झोन करणे व त्याची अंमलबजावणी करणे, रस्त्याबाबतच्या प्रलंबित कोर्ट केस बाबत पाठपुरावा करण रस्त्यांवरील अडथळा आणणा-या झाडांबाबत उचित उपाययोजना करणे, अडथळा करणा-या आस्थापनांवर कारवा करणे तसेच या रस्त्यांवर वाहतूक विलगीकरण टेक्नीक्सचा वापर करणे असे सर्व आवश्यक कामे हे पुणे महानग पालीका व इतर प्राधिकरणांचे समन्वयातुन करण्यात येणार आहेत.
या प्रोजेक्ट करिता पुणे महानगरपालीका व वाहतूक शाखा पुणे शहर हे एकत्र मिळुन एक मोबाईल अॅप विकसीत करणार आहेत या द्वारे वाहतूक शाखेचे विभाग व महानगरपालीका यांचे क्षेत्रीय कार्यालय यांचा समन्वय साधुन चौक सुधारणा व मुख्य रस्त्यावरील सुधारणा व नियोजन करण्यात येणार आहे. तसेच भविष्यात हे अॅप नागरिकांना उपलब्ध करुन देवुन त्याद्वारे नागरिकाना त्यांचे भागातील समस्या नोंद करता येतील तसेच त्याचे झालेले निराकरण पाहता येईल. वाहतूक शाखेचे नियोजन पाहता येईल तसेच वाहतूक सुधारणा बाबत सुचना करता येतील. वाहतूक शाखेकडून या मुख्य रस्त्यावर केले जाणारे उपाययोजना सोबत शहरातील पार्किंग व्यवस्था, शहरातील वाहतूक कोंडी, वाहतूकीमध्ये करण्यात आलेले बदलाबाबतचे नोटीफिकेशन, बस स्टॉप, अॅटो स्टॅण्ड तसेच पिएमपीएल स्टॉप इत्यादी आवश्यक माहिती मिळण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेने गुगल सोबत वैशिष्टपुर्ण करार केलेला आहे त्याची अंमलबजावणी येत्या काळात सुरु होणार आहे.
निवडण्यात आलेल्या 32 रोड पुढील प्रमाणे ..
१. सोलापूर रोड
२. खराडी बायपास ते मगरपट्टा रोड
३. नॉर्थ मेन रोड ते सोलापुर रोड
४.पुणे सासवड रोड ५. कात्रज मंतरवाडी बायपास
६. नगर रोड
७.नविन आर पोर्ट रोड
८.जुना एअर पोर्ट रोड
९ . आळंदी रोड
१०.जुना पुणे-मुंबई रस्
११. सातारा रोड
१२. सिंहगड रोड
१३. शास्त्री रोड
१४. नेहरू रोड
१५. बाजीराव रोड
१६. शिवाजी रोड
१७.संताजी घोरपडे रोड
१८. नॉर्थ मेन रोड
१९. साधु – वासवानी मार्ग नेहरू चौक ते
२०.बंडगार्डन रोड दोराबजी मॉल
२१. डॉ बाबासाहेब आंबेडकर रोड आरटीओ चौव
२२. एमजी रोड गोळीबार मैदान
२३.प्रिन्स ऑफ वेल्स रोड भैरोबा नाला –
२४. कोंढवा मेन रोड गोळीबार मैदान
२५. जंगली महाराज रोड संचेती चौक
२६. एफ.सी. रोड खंडोजी बाबा
२७. गणेशखिंड रोड संचेती हॉस्पिट
२८. सेनापती बापट रोड एस बी जंक्शन
२९. बाणेर रोड पुणे विद्यापीठ
३०. पौड रोड पौड फाटा ते
३१. कर्वे रोड खंडोजी बाबा
३२. कन्हेरे रोड नळ स्टॉप –



