पुणे शहरात मोहरम सणानिमित्त ताबूत मिरवणुक दरम्यान वाहतुकीत बदल, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आव्हान
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
पुणे शहरात दिनांक १७/०७/२०२४ रोजी, मोहरम सणानिमीत्त खालील नमूद मार्गावरुन ताबूत, पंजे, छबिले यांचे विसर्जन करणेकरीता मिरवणूका निघणार आहेत. सदर मिरवणूकी दरम्यान वाहतुकीची कोंडी होऊ नये, वाहतुक सुरक्षीत व सुरळीतपणे सुरु राहावी,वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विभागाकडून तात्पुरता बदल करण्यात आला आहे. असे हिंमत जाधव, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा पुणे शहर, अति. कार्य. वाहतुक शाखा पुणे शहर, यांनी परिपत्रका द्वारे कळवण्यात आले.
अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इ.) खेरीज करुन खालीलप्रमाणे वाहतुक बंद/वळविणे बाबतचे आदेश देण्यात आले आहेत तसेच नमूद मिरवणूक मार्गावरील वाहतूक आवश्यकतेनुसार अल्पकालावधी करीता बंद अथवा वळविण्यात येणार आहे तसेच मिरवणूक पुढे सरकताच पाठीमागील वाहतूक पुर्ववत करण्यात येईल. तरी वाहन चालकांनी वरील नमूद मार्गावर येण्याचे टाळावे तसेच पर्यायी मार्गाचा वापर करावा.असे आव्हान करण्यात आले
मोहरम मिरवणूक चे मार्ग …
१. मुख्य मिरवणूक (दुपारी १५.०० वा.)
मार्ग :- श्रीनाथ टॉकिज येथुन निघुन दत्त मंदीर- बेलबाग चौक बुधवार चौक जिजामाता चौक डावीकडे वळुन शनिवारवाडा फुटक्या बुरुजास यळसा घालुन शनिवारवाडा समोरील गाडगीळ पुतळा चौक- उजवीकडे वळुन डेंगळे पुल- गाडीतळ चौक डावीकडे वळुन रेल्वे पुलाखालुन आरटीओ चौक ते संगम ब्रीज विसर्जनाचे ठिकाणी संगमघाट विसर्जन ठिकाण,
२. लष्कर मिरवणूक (दुपारी १२.०० वा.)
मार्ग :- ६८४ तायुत पंजे ताबुत स्ट्रीट येथे एकत्र जमुन, बाटलीवाला बगीचा सरबतवाला चौक बाबाजान दर्गा भोपळे चौक गावकसाव मशिद डावीकडे वळून एम.जी. रोडने कोहीनूर चौक भगवान महावीर चौक नाझ हॉटेल चौक डावीकडे वळून वुटी स्ट्रीटने बाटलीवाला बगीचा चौक या ठिकाणी १४.०० वा. चे सुमारास येऊन धार्मिक कार्यक्रमासाठी थांबतात. त्यानंतर पुढे नेहरू मेमोरीयल हॉल रहीम पेट्रोल पंप जुना समर्थ पोलीस स्टेशन मार्गे डावीकडे वळून पॉवर हाऊस चौक के.ई.एम. हॉस्पीटल समोरुन अपोलो टॉकिज चौक दारुवाला पुल फडके हौद चौक डावीकडे वळुन मोती चौक सोन्या मारुती चौक उजवीकडे वळुन विजय मारुती चौक ते बेलबाग चौक मार्गाने श्रीनाथ सिनेमा येथे येऊन मुख्य मिरवणुकीत सामील होते.
३. खडकी भागातून निघणारी मिरवणूक (दुपारी १८.४५ वा.)
मार्ग : ताबुत मिरवणुक बोपोडी चौक येथे येवुन मुंबई पुणे रोडने दापोडी नदी किनारी विसर्जन होणार आहे.
४. पाटील इस्टेट गल्ली नं १० मिरवणूक (दुपारी १४.०० वा.)
मार्ग:- रेशीम विभाग व दुध डेअरी जवळील ताबुत मिरवणुकीने पाटील इस्टेट या ठिकाणी येवुन पुन्हा परत जागेवर येणार आहेत. तसेच पाटील इस्टेट गल्ली ने १० येथील तावुत मिरवणुक संगम ब्रिज या ठिकाणी येवुन विसर्जित होणार
५. इमामवाडा येथून निघणारी मिरवणूक (सकाळी १०.३० वा.)
मार्ग इमामवाडा लष्कर ते आगाखान कंपाऊंड ते परत इमामवाडा मार्ग रहिम पेट्रोलपंप, नेहरु मेमोरीयल चौक, डावीकडे वळून पोलीस आयुक्त कार्यालय समोरुन जनरल पोस्ट ऑफिस चौक, साधु वासवानी चौक, १३ कॅनॉट रोड, आगाखान कंपाऊंड येथे धार्मिक कार्यक्रम होऊन परत उलट मार्गाने इमामवाडा येथे विसर्जन.



