विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे पाचही उमेदवार विजयी
मुबंई प्रतिनिधी :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहे. आज विधानभवनात सर्व आमदारांनी मतदान केलं असून त्याचा निकाल आता हाती येत आहेत. भाजपकडून पाच, शिवसेना शिंदे गटाकडून दोन, अजित पवार गटाकडून दोन तर महाविकास आघाडीकडून तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत.
विधान परिषद निवडणुकीसाठी विजयी कोटा हा २३ मतांचा ठरवण्यात आला आहे. यातच सुरूवातीपासून भाजचे योगेश टिळेकर यांनी आघाडी घेतली होती. योगेश टिळेकर यांनी पहिल्या पसंतीची मते मिळवून विजय मिळवला आहे. त्यामुळे योगेश टिळेकर यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत पहिला विजय मिळवला आहे.
या निवडणुकीत पक्षीय बलाबल पाहता विजयासाठी 23 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीने 1 उमेदवार जास्त दिल्याने चुरस वाढली होती. महायुतीकडे असणारी मते पाहता त्यांची 8 उमेदवार सहज जिंकून येणार होते. पण त्यांनी 9 वा उमेदवारदिल्याने या निवडणुकीतली लढत अटीतटीची ठरली. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षांनी प्रत्येकी 1 उमेदवार दिला होता. महाविकास आघाडीच्या एकूण मतांचा विचार करता त्यांचे तीनही उमेदवार सहज जिंकून येऊ शकले असते. पण या निवडणुकीत महायुतीने मविआला धक्का दिला.
अखेर महायुतीच्या घटकपक्षांचे हे प्रयत्न यशस्वी ठरताना दिसले. महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले.
भाजपचे विजयी उमेदवार –
1) पंकजा मुंडे – 26 मतं
2) परिणय फुके – 23 मतं
3) सदाभाऊ खोत – 26 मतं
4) अमित गोरखे – 23 मतं
5) योगेश टिळेकर – 23 मतं
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विजयी उमेदवार
1) शिवाजीराव गर्जे – 23 मतं
2) राजेश विटेकर – 24 मतं
शिवसेना विजयी उमेदवार
1) कृपाल तुमाने – 25 मतं
2) भावना गवळी – 24 मतं



